Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

दीनदयाळ दिवा ©️

दीनदयाळ दिवा ©️

दिवा कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. त्याला तुम्ही शरण गेलात. त्याने तुम्हाला प्रकाश दिला आहे. प्रकाश तुम्ही स्वतः घेऊन आलेले नाहीत. तोच दिन, तोच दिवा प्रत्यक्ष घडण घडते ती पाहत आहे. असे असताना सेवेकर्‍यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे, पण या ठिकाणी जे घडते ते कोणीतरी पाहते. हे लक्षात ठेवा. सेवेकरी बोलून जातो, घडण घडते. कोणीतरी घडवून घेत असते. त्यांचे कर्तव्य ते घडवून घेत आहेत.

सेवेकरी हा नामा निराळा आहे. काही सेवेकरी प्रकाशमान आहेत. सानिध्यात गती घेत आहेत. गती घेत असताना, आसनाधीस्त अन माझे बोलणे चालत असताना मीच शहाणा म्हणून त्यांची मान डोलत असते असे झाले आहे, तोच सांगत आहे. ही घडण मीच घडवून घेतो. ओळखले आहे तर अनेकात तत्व एकच आहे. त्याही सेवेकऱ्यात मीच आहे. अन् दुसऱ्यातही मीच आहे. असे जर वाटत असते तर त्याने तसे केले नसते. ©️

You cannot copy content of this page