चार दिशेला चार दरबार आहेत. दक्षिण, उत्तर व पूर्वेला एक एक दरबार आहे. उत्तरेच्या बाजूला जो दरबार आहे, त्याची गोपाल स्वामी नाम घेऊन स्थापना झाली.
वेषांतर – जठाधारी – अशा प्रकारचे आहे. पूर्वेच्या बाजूला जो दरबार आहे, त्या दरबारात आतापर्यंत तीन तऱ्हेची कार्ये होत आली. त्यात तीन ज्योती निर्माण झाल्या. प्रथम ज्योतीचे नामाभिधान सुजेंद्रनाथ होय.
हि प्रथम ज्योत निर्माण केल्यानंतर पूर्व जन्माप्रमाणे विलीन झाली. (मधली ज्योत गुप्त आहे) आता तिसरी ज्योत सुजेंद्रनाथ या नावानेच चालली आहे. तिचे नामाभिधान सुजेंद्रनाथ दयाळजी असे आहे. (दयाळ स्वामी अशा प्रकारचे आहे.)
त्या ठिकाणी प्रवेश नाही. फक्त प्रवचन होत असते. त्यात विवेकानंद, दयानंद, राधास्वामी अशा अनेक ज्योती झाल्या आहेत. त्यांनी कार्ये अनेक तऱ्हेची केली. मधल्या ज्योतीच्या हातून काहीतरी घडले म्हणून गुप्त आहे.
दक्षिण दिशेला विशाखापट्टणमच्या बाजूला अशा दरबारची स्थापना झालेली आहे. त्या ठिकाणी कन्नमवार स्वामी आहेत. त्या ठिकाणीही प्रवेश नाही. पण अशा तऱ्हेने गुप्त संदेश घेत असतात. आसन घातलेले आहे. ज्योती आसनावर आहेत. परंतु गुप्त संदेश घेत असतात.
या ठिकाणी आल्यानंतर त्याची पातळी पाहून सर्व काही होते. ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळते. भूमी शुद्ध झाल्या नंतर प्रथम उपदेश, नंतर आदेश, नंतर अनुग्रह असा क्रम आहे.(समाप्त) ©️