हा दरबार दैवतांचा किंवा व्यक्तींचा दरबार नाही. अनंत काळापासून चालत आलेला हा दरबार आहे. या चार दरबारांची स्थापना अनंत काळाची आहे. त्या पैकीच हा एक दरबार आहे.
जो ज्या तऱ्हेने पाहतो त्याप्रमाणे त्याला त्याची ओळख होते. याची शोभा अनंत काळापासूनची आहे. आता कार्य करण्यासाठीं अवतार कार्य सुरू झालेले आहे. त्याचा थोडासा भाग होत आला आहे. आता खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवात होणार आहे.
या दरबारच्या सेवेसाठी ऋषी, मुनी, दैवते तत्परतेने उभी आहेत. या दरबारच्या सेवेकऱ्यांचे भाग्य खरोखरच थोर आहे. पूर्व जन्मीच्या ठेव्याशिवाय हे लाभणार नाही.
अनेक ज्योती येणार आहेत. पूर्वीच्या आलेल्या ज्योती केव्हाही वाया जाणार नाहीत. असा हा दरबार आहे. याची महती ज्याला चाखता आली, असा हा अत्यंत श्रेष्ठ ठेवा प्रत्येकाने जतन करून ठेवला पाहिजे.
अनंत काळापासून चालत आलेल्या चार दरबारापैकी हा प्रथमचा दरबार होय. तेंव्हा या ठिकाणची प्रसन्नता पाहून, आरती घेवून जाण्याचा ठाम निश्चय झाला व तो पूर्ण सफल झाला. इतर तिन्ही दरबारात अशा तऱ्हेने विवरण होत नसते. म्हणूनच आरती घेवून जावयाचे होते. त्या तीन दरबारच्या सूक्ष्म ज्योती येथे आल्या होत्या. कोणी पाहिल्या का? कोणाला दिसल्या का? आदेश दिला होता. त्या ज्योती आल्या आहेत हे पाहण्याची मोकळीक दिली होती. ©️