Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

हिरण्यक राक्षस फार माजलेला होता. मग त्याच्याच बालकाकडून कार्य करून घेतले. एका हिरण्यकासाठी किती रगडले गेले? प्रल्हादा मागे सुद्धा सात्विक ज्योती होत्या. …

समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला समर्थांशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही. असा …

सेवेकऱ्याच्या, भक्ताच्या अंगी लिनता असली पाहिजे. जो खरोखरीच लिन झाला आहे, त्याला तहान, भूक, मान, अपमान काही नाही, असा सेवेकरी झाला, मग …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

हिरण्यक राक्षस फार माजलेला होता. मग त्याच्याच बालकाकडून कार्य करून घेतले. एका हिरण्यकासाठी किती रगडले गेले? प्रल्हादा मागे सुद्धा सात्विक ज्योती होत्या. …

समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला समर्थांशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही. असा …

सेवेकऱ्याच्या, भक्ताच्या अंगी लिनता असली पाहिजे. जो खरोखरीच लिन झाला आहे, त्याला तहान, भूक, मान, अपमान काही नाही, असा सेवेकरी झाला, मग …

त्रास सहन केला पाहिजे ©️

त्रास सहन केला पाहिजे ©️

सत मार्गाने जाणाऱ्या ज्योतीना त्रास का? सत्य आहे. हा वाजवी प्रश्न आहे. पण सत् मार्गाने जाणाऱ्या ज्योती किती आहेत? मानव हा स्थुल देही आहे, पण पूर्व संचिताचे काय? आदी अंतापासून किती संत होऊन गेलेत त्यांनी असे विचारले नाही.

मानवाच्या मनाची चंचलता, त्याचप्रमाणे शंकाकुल स्थिती, म्हणून म्हणतो हे कलियुग आहे ! पण भक्ती आदीअंतापासून एकच आहे, मग असे का? अवतार कार्य का नटवावे लागते? सत, असत मानव आहेत, का मी आहे? मी सतात पण आहे आणि असतात पण आहे. मी करून घेतले, तर कोणकोणते कर्तव्य करून घेतो? मी सगळेच करतो तर मानव दुःख का भोगतो?

सेवेकरी मनाच्या आधीन बनल्यानंतर, एकदा दोनदा गती दिली असताना सुद्धा मायेच्या आधीन गेल्यानंतर, मी त्याला मागे खेचत नाही. ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा भोगत्वातून सोडले नाही, मग मानव त्यांच्यापुढे काय आहे? म्हणून मानवांना हे सुटले नाही व सुटणारही नाही. सताला त्याचे शुभ अशुभ काही नाही. अघोर मानवांना ब्रह्मज्ञान किती जरी सांगितले, तरी ते पटणार नाही. सत् हे केसापेक्षाही लहान आहे, मग त्याला कोणी ओळखेल का? ज्याने ओळखले तो दैवतांची पूजा करेल का? अघोरांच्या पाठीमागे लागेल का? सताचा जरी वर पगडा जास्त झाला तर ते सुद्धा शांत रितीने राहू शकत नाही. जर सत् होते, तर महाराष्ट्राला शाप का दिला? मग याला तुम्ही तोड शोधून काढा. शेतात पीक चांगलं लावले, तर त्या पिकालाच किंवा त्या बाजूलाच पाणी पाजा, पण शेतात दुसरी वनस्पती उगवतेच नां? मग त्याना का पाणी पाजा? तसेच हे आहे. शेतात ऊस लावला तर उसाबरोबर दुसऱ्या वनस्पतीलाही पाणी मिळते, म्हणून सत् असत दोघांचे घर्षण झाल्याशिवाय अग्नी निर्माण होत नाही. तो अग्नी निर्माण झाल्यानंतर सत् तारले जाते. असताचा नाश होतो. मग त्या वेळेला सताला त्रास होतो की नाही? तो त्रास सताने सहन केला पाहिजे. ©️

You cannot copy content of this page