श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात, त्यांची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या तऱ्हेचा आहे. हल्लीच्या काळात चमत्कार नमस्काराला भाळणारे मानव जास्त आहेत. सद्गुरु तत्व काय आहे, याची त्यांना माहिती नाही. ते समजतात, सद्गुरु हे मानव आहेत अन् परमेश्वर तत्त्व वेगळे आहे, अशी त्यांची भावना आहे म्हणून परमेश्वर प्राप्ती होण्यासाठी अवधी लागतो.
काही नवीन येणाऱ्या ज्योती आहेत, त्या ओघाने येणारच आहेत. येथील सेवेकऱ्यांना सद्गुरु तत्व पटले असले, तरी आपली सद्गुरूं वरील श्रद्धा ढळू द्यावयाची नाही. माया सेवेकऱ्यांचा कस घेते आहे, पण ती घेऊन घेऊन तरी किती कस घेणार?
सेवेकऱ्यांनो, तुम्ही कोणीही नाहीत. एकच, आत्मज्योत तुमच्या स्वरूपात फेकली आहे, म्हणून तुमच्यावर मोठा पडदा टाकून तुमच्याकडून हे करून घेत आहे. फक्त एकच ध्यानात ठेवणे, तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. (समाप्त) ©️
