श्री समर्थ मालिक – आरतीचे वेळेला सर्व सेवेकरी ललकारी म्हणतात, तिचा अर्थ सेवेकऱ्यांनी केला तर कळेल. ॐ कार बीज मात्रेन नित्यं ध्यायंती योगिन: | कामदम् मोक्षदम् चैव ॐ काराय नमो नमः ||
हा कोण याची ओळख करून, स्वतःची दृष्टी हि तेजोमय करून योग्याला पाहण्याचा प्रयत्न करा. तो योगी कुठे आहे, हे सेवेकर्यांनी विसरता उपयोगाचे नाही. सर्वस्व सांगितले तरी, सेवेकऱ्यांच्या लक्षात राहील कि नाही कोण जाणे? पण मायावी लगट लवकर ध्यानात राहते, म्हणून, होते ते चांगल्यासाठीच होते.
काही सेवेकरी आपल्या कर्तव्यात तल्लीन होते. तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. सेवेकऱ्याला पाहता आले नाहीत तरी क्षमा आहे. सेवेकऱ्याने एकाच तत्वाने आपल्या प्रकृतीचा उजाळा करणे हे संदेश आहेत.
दिलेली तिजोरी भरपूर झाली की प्रकृतीचा उजाळा लवकर होतो. नामस्मरण हे साधे सोपे नाही. रस्त्याने चालला तरी लहर लागली पाहिजे. लहर लागली तर पावलोपावली चमत्कार करीन. पण सेवेकरी त्याने हुरळून जाईल. परंतु सेवेकर्याची मनोभावना तशी झाली, तर हे करावे लागते.
सर्व सूत्राची दोरी माझ्या आधीन आहे. काही डोळस आहेत, काही नादातीत आहेत. डोळस म्हणजे सानिध्यात घेतलेले, नादातीत म्हणजे उपासना करणारे. पण त्यांना दाखवणारा पाहिजे, म्हणजे हे नादातीत डोळस होतील. तेव्हा त्यांना समजेल. पंजा मस्तकावर पडला कि ते डोळस होऊन त्या मार्गाने जातील. अशा तऱ्हेने त्यांना भक्तीची खूण सापडली की मग ते सत् भक्तीच्या गतीने जातील. मग मात्र तीर्थ करण्याची अगर क्षेत्रे भटकण्याची आवश्यकता नाही. ©️
