हिमालयात बसवले तेव्हा भगवी वस्त्रे होती. म्हणून हे कर्तव्य इतरांकडून होणार नाही. त्यामुळे हिमालयातून कोकणात पाठविले. आपण मला ओळखले, मी तुम्हाला ओळखले ! यातील सेवेकर्यांची तितकी पात्रता नाही. यांच्याकडून टोलवा टोलवी ही होणारच. ही अशी तऱ्हा आहेच. या मानवी सेवेकर्यांची तितकी पात्रता नाही. सेवेकरी असे बनले तर आपणाला त्रास होणार नाही.
परब्रम्ह तत्व आपल्या ठायीच सर्वभूतेषु भरलेले आहे अन् भरून सुद्धा अलिप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा आहे. पण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय थांग लागणे कठीण आहे. आकाराला पुजल्याशिवाय निराकाराची ओळख होणार नाही. जे आकारी आहेत, त्यालाच ॐ कार स्वरूप हे नामाभिधान आहे. याची वाढ कोणी करावयाची? मानवी तऱ्हेने त्रास झाला तर असं ना जवळ सांगता. पण कृतीमान असेल तर सांगण्याची आवश्यकता होईल का? म्हणूनच जे अखंड आहे, त्याची निर्मिती नाही. ते धावत नाही, सापडत नाही, कोणी म्हणतात हवा आहे, कोणी म्हणतात गंध, पण शक्ती किती आहे याची गणना कोणी केली नाही. हवा म्हणजेच प्रणव ! अन् हे ब्रह्म आकारी तसेच निराकारीही होऊ शकते. तो त्यांचा अधिकार आहे. पण सेवेकर्यांची पाहण्याची ताकद आहे का? जोपर्यंत सेवेकर्यांनी आसनाधिस्तांना ओळखले नाही, तोपर्यंत सेवेकरी असेच लुडबुड करणार ! आपण शुद्ध स्फटिकासारखे असल्यानंतर मग त्रास होईल का? हे सेवेकर्यांनी ओळखावे. (समाप्त)©️
