मालिक – प्रवचन भक्तीचे अंग फार न्यारे आहे. मी फार दूर नाही. आत्ताची प्रवचने जडत्वावर चाललेली आहेत. जडत्वाला जडत्वाची आवश्यकता असते, पण त्याच्या योगाप्रमाणे, त्याच्या संचिताप्रमाणे मिळणार. त्याचात तीळ मात्र शंका नाही. जर तो हात टेकू लागला तर घडेल किंवा नाही हे सांगता येणार नाही. याच्यात काही चूक नाही.
मानवता पूर्ण समजली म्हणजे कशाची आवश्यकता? सख्या भावाभावात एक विचार नाही. गुरुबंधूंचे नाते, कोणाचा कोणावर विश्वास नाही. किती जडत्वाची आवश्यकता असते. नाते, हे एवढे मोठे जग, याची गती घेतली तर मला वाटत नाही एवढे कलह होतील. मानवता जरी सेवेकर्यांना कळली, तरी वळत नाही आणि मग मी आणि तू वाढते. मग म्हणतात, “हेच तुला तुझ्या सद्गुरूंनी शिकवले आहे काय?”
आपणाला मानवता धारण करण्याचे संदेश आहेत. (एका सेवेकऱ्याची सूचना – तडाखे द्या) त्यावर मालिक म्हणतात, “तडाखे देणे ही यथायोग्य स्थिती नाही. त्यांना स्वतःच्या स्वयम् बुद्धीने समजले पाहिजे. परंतु मारून झोडून वळण लावणे हे यथायोग्य नाही.” सेवेकरी वाहू लागला, मग काय करायचे? त्याची मला पूर्ण गती आहे, पण होता होईल तेवढे सहन करणे. आपण काळजी करावयाची नाही.
परंतु सेवेकऱ्याने विचार केला पाहिजे की, माझे कुठे चुकते आहे? काही जडत्वाला संपत्ती अतीयुक्त दिलेली आहे, पण त्याला तरी शांती, समाधान आहे काय? कोट्यावधी मानव महान श्रीमान आहेत, पण त्यांना सुद्धा समाधान आहे काय? सेवेकऱ्याने जे आहे, कितपत पाहिजे आहे, त्याची आपल्या सुखात खुणगाठ बांधून ठेवली पाहिजे. ©️