Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

जगत् जननी निवेदन ©️

जगत् जननी निवेदन ©️

मानव हे तत्व अचल नसून, ते चल तत्व आहे. अन अशा तऱ्हेच्या गतीमुळे कर्तव्य करावे लागते. जरी शक्ती असली तरी आसनाची सेवेकरी आहे. काही चूक असेल तर क्षमा करावी. सर्व जगताचे परमनिधान असे जे महान तत्व, त्यांच्या ठिकाणी काही एक लपविता येणार नाही. कर्तव्याच्या वेळी अहंभावाच्या आहारी जाऊन, अघटीत चुका झाल्या आहेत.

आसनाधिस्त ही एक मानव ज्योत आहे अशी भावना झाली म्हणून चूक झाली आहे. कर्तव्यात अनेक वेळेला लाघवी तऱ्हेने खो घातला आहे, कारण मानव आमच्या कक्षेच्या बाहेर जाऊ नये म्हणून हे कर्तव्य केले, पण माझ्या सद्गुरूंनी मला जाणीव दिल्यानंतर, आता मी असे करणार नाही असेच मी माझे मत बनविले आहे.

सत हे कधीही डावलता येणार नाही, पण मी डावलले, त्या वेळेला मी त्याच तोऱ्याने वावरत होते ती म्हणजे मी जगत् जननी – मला अहंभाव निर्माण झाला होता. त्रिगुण माझ्या आधीन. मीच सर्वस्व ही भावना निर्माण झाली. मला ओळख असूनही जाणीव झाली नाही. जर झाली असती तर हे प्रमाद घडले नसते. चारही देहाची शक्ती जगतजननी वापरू शकते. तिला आदिमाया आदिशक्ती देखील म्हणतात. जगत जननी म्हणून आदर देणे कर्तव्य आहे. ©️

You cannot copy content of this page