Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

घोडबंदरचे बाबा संवाद २ ©️

घोडबंदरचे बाबा संवाद २ ©️

बाबा – तुम्हीच मला सांगितले की काशीमध्ये हाक मारुन मला अनुग्रह दिला. १२ वर्षे माहूर गडावर पाठविले. हे किती भाग्याचे लक्षण आहे.

गोपाळकृष्ण – मी चुकीला पात्र आहे. मला ते टिकविता आले नाही. उच्च वर्णाच्या अभिमानामुळे मी घसरलो.

बाबा – कसले उंच?

गोपाळकृष्ण – प्रकृती अंगाने नटलेले जडत्व भिन्न असल्यामुळे उच्च वर्ण दाखवायचे. सत् तत्व हे दाखवित नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती भिन्न असतात. हि पायरी दूरावल्यामुळे आम्ही फसलो गेलो. कोणीही उच्च आणि कोणीही नीच नाही. सर्व एकाच समर्थांची लेकरे आहेत, पण जो जाणेल त्याला ! सध्याच्या काळात तीच परिस्थिती आहे. या ठिकाणी अखंड चमत्कार होऊ लागले तर बसायला जागा मिळणार नाही.

बाबा – कृपया या ठिकाणी चमत्काराची दिशा दाखवू नका.

गोपाळकृष्ण – हे चमत्कार मानवांना पहावयास मिळाले की त्या ठिकाणी काहीतरी आहे असे मानवाला वाटते. पण हे कशामुळे होते हे कोणीही शोधीत नाही. भक्तीला संदेश दिले तर कोणीही भक्तीला तत्पर होणार नाहीत. सत भक्तीचे लोण सर्वांना मिळेल हे बाकी सांगता येणार नाही. भक्तीचे मार्ग दोन आहेत. एक सत आणि दुसरा अघोर. अघोरी भक्तीने जाणाऱ्या ज्योती जास्त असतात.

बाबा – अघोर कोणाला म्हणावयाचे?

गोपाळकृष्ण – अघोर मार्ग म्हणजे ऋद्धी, सिद्धी, चमत्कार, नमस्कार यांनी नटलेला मार्ग आणि ऋद्धी सिद्धी मुळे होणारे चमत्कार याला अघोर मार्ग म्हटले आहे. ©️

You cannot copy content of this page