Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

गुरुपद हे ज्ञानमय बीजारोपण करण्यासाठी विखुरले आहे ©️

गुरुपद हे ज्ञानमय बीजारोपण करण्यासाठी विखुरले आहे ©️

श्री समर्थ मालिक – पूजा करताना कोणीही घाबरण्याची आवश्यकता नसते. ती करताना शांत विचार ठेवूनच करावी. कोणत्या हाताने पूजा करावी हे लक्षात ठेवा. अशावेळी चूक म्हणणे योग्य नसते. प्रेम भावनेने केलेली पूजा मान्य करून घेणे असते.

सेवेकऱ्यांचे हे ठिकाण पवित्र अन् सेवेकऱ्यांचे कर्तव्य हे पवित्र, हे येथील सेवेकर्‍यांनी समजावयास पाहिजे. कोणत्याही सेवेकऱ्याने आपल्या मनाची भावना गढूळ होऊ देता कामाची नाही. सेवेकरी चुकला आणि चुकतो तरी त्याला मर्यादा आहे.

गुरुपदाचा महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. गुरुपद हे अखंड त्रिकाला बाधित आहे. ते कोणीही निर्माण केलेले नाही. कोणीही निर्माण करविता नाही. असे हे स्वयं आणि अखंड पद आहे. याची महती, महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांची वाणी याला अतिशय महत्त्व आहे. गुरुपद हे ज्ञानमय बीजारोपण करण्यासाठी विखुरले आहे. हे अनाठाई जाणार नाही. स्वयंपद गुरुपदाच्या मुखातून निघाले, तरी पण ते गुरुपदाला किती लिन आहे? गुरुपदाच्या मुखातून निघालेली अमृततुल्य वाणी झेलने हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. ©️

You cannot copy content of this page