श्री समर्थ मालिक – पूजा करताना कोणीही घाबरण्याची आवश्यकता नसते. ती करताना शांत विचार ठेवूनच करावी. कोणत्या हाताने पूजा करावी हे लक्षात ठेवा. अशावेळी चूक म्हणणे योग्य नसते. प्रेम भावनेने केलेली पूजा मान्य करून घेणे असते.
सेवेकऱ्यांचे हे ठिकाण पवित्र अन् सेवेकऱ्यांचे कर्तव्य हे पवित्र, हे येथील सेवेकर्यांनी समजावयास पाहिजे. कोणत्याही सेवेकऱ्याने आपल्या मनाची भावना गढूळ होऊ देता कामाची नाही. सेवेकरी चुकला आणि चुकतो तरी त्याला मर्यादा आहे.
गुरुपदाचा महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. गुरुपद हे अखंड त्रिकाला बाधित आहे. ते कोणीही निर्माण केलेले नाही. कोणीही निर्माण करविता नाही. असे हे स्वयं आणि अखंड पद आहे. याची महती, महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांची वाणी याला अतिशय महत्त्व आहे. गुरुपद हे ज्ञानमय बीजारोपण करण्यासाठी विखुरले आहे. हे अनाठाई जाणार नाही. स्वयंपद गुरुपदाच्या मुखातून निघाले, तरी पण ते गुरुपदाला किती लिन आहे? गुरुपदाच्या मुखातून निघालेली अमृततुल्य वाणी झेलने हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. ©️
