Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

कोण देतो अन् कोण घेतो ? ©️

कोण देतो अन् कोण घेतो ? ©️

श्री समर्थ मालिक -जपतप खटपट केलीस काही | ज्ञानावाचून मुक्ती नाही || ज्ञान पाहिजे जरी सत्य | तरी करी तू नित्य योग्य हे पथ्य ||

ज्ञान म्हणजेच प्रकाश ! संतांचे ज्ञान पोथी पुराणे वाचून नाही. संत आहेत काय? टाळ वाजून किती चालले आहे? जगाच्या जननी पुढे कीर्ती चालली आहे. केवढे जपतप? जप कोणाचे? प्रकाश कोणाचा? याची गती आहे काय? किर्ती, जप, तप करून तरी मिळू शकले आहे काय? पहावयास गेले,‌ घ्यावयास गेले तरी घेता येत नाही.

अशाच काही संतांनी घेतले, ते घेऊन गेले. खटपट, खटाटोप मानवाचा ! खटाटोप संत नाही करत. अन् कराल तर मुक्ती मोक्षाला जाल काय? हे करत आहे, ते करत आहे असे काही मानव आहेत. या दरबार मध्ये सेवेकरी आहेत. पण करून घेणारे कोण आहेत? असे तत्व जोपर्यंत अशा मानवाला कळले नाही, तोपर्यंत जप तपाचा काही उपयोग नाही. विशेष ! आसनाच्या सेवेकऱ्यांना तरी जप तप कळले आहे काय? कसले ज्ञान पाहिजे? मानवाने मानवता ओळखली नाही तर पुढे काय? ज्याला अखंड नाम पाजले आहे, अन् पुढे काय? असे हे तत्व आहे. त्याच नामाचा जप अन् तप अन् त्याचीच खटपट तन्मयतेणे करणे.

लिनता, नम्रता आणि शांती यांचा त्रिवेणी संगम हेच मोठे ज्ञान आहे. ज्ञानाचा प्रकाश आहे. दोघेही सेवेकरी आहेत. सेवेकऱ्यास ज्ञानाप्रमाणे कुठे घालवायचे व ठेवावयाचे, त्याचे ज्ञान पाहिजे आहे अशी सेवेकर्‍यांनी अपेक्षा करू नये. कोण देतो अन् कोण घेतो ? ज्यांना अखंड तत्व मिळाले आहे, त्यांचे आदेश, संदेश मानले आहेत काय? ©️

You cannot copy content of this page