Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

कोण कोणाचे कोणाला वाहतो? ©️

कोण कोणाचे कोणाला वाहतो? ©️

प्राण सर्वस्व अर्पण केलेल्याची गती कशावरून दिसून येते, त्याची स्थिती कशी ओळखली जाते? तर त्याच्या चेहऱ्यावरचे तेजच वेगळ्या तऱ्हेचे दिसते. त्याला एका भगवंताशिवाय काही दिसत नाही. त्याच्या प्रकृतीवरचे, तोंडावरचे तेज सात्विक दिसते. म्हणून त्या तऱ्हेची कृती झाली, तरच प्राण अर्पण केल्यासारखे होते. “सगुनाचा सार घेणे यातच सर्वस्व आहे.”

संसारात राहूनच हे कोणाचे कृपेने चालले आहे, कुणाच्या कृपेने करतो आहे, हे ज्याला समजले, ज्याने जाणले तो कुठेही भीक मागावयास जाणार नाही. पण अशी कृती होणे कठीण आहे. हे सर्वस्व समर्थांचे आहे, त्यांच्याच कृपेने कर्तव्य परायण आहे, कर्तव्य करतो आहे, अशी ज्याची ठेवण, मग यश त्याचे आधीन आहे. मग एकाच्या सख्यत्वासाठी प्राण अर्पण केला की न केला, हे सेवेकऱ्यांने ओळखावे. असे ते तत्व कोणते आहे?

एकाच्या सख्यत्वासाठी मी काही नाही केले, पण त्यांच्यात भक्ती असून तो मायावीत असला तरी तो माझा आहे. पण शेवटी तो काय घेऊन जातो? अन् कोणाचे कोणाला वाहतो? हे त्याला कळत नाही. याचा निर्माता कोण? प्रेम निर्माण कोण करतो? भाव निर्माण करणारे, चेतना निर्माण करणारे अशी काही तत्वे आहेत. पण ठाम निश्चय करणारा तरी कोण? मनाची चलबिचल करणारा कोण? म्हणून एकाच ठिकाणी तरी ठेवणारा कोण? सर्वस्वी संपत्ती जरी मला अर्पण केली, तरी मला संपत्तीचे काय करावयाचे? मी तर निष्कामच आहे. मला संपत्तीची आवश्यकता काय? इतके समजावे, आम्ही जे करतो, धरतो, संपत्ती जमवितो ते कोणाचे सत्तेने करतो? हे त्याने समजावे व त्याप्रमाणे वाटचाल करावी. आणखी काय सांगावे? यात रामदासांचे काय चुकले? त्यांनी काव्यरचना केली ती बरोबर आहे. (समाप्त)

You cannot copy content of this page