श्री नर्मदा निवासी मालिक – कर्तुम अकर्तुम जी शक्ती आहे, त्यांच्या भक्तांना व्याप होतात. त्याची पाहणी करणे कर्तव्य आहे. आकाराला चेतना देऊन निराकारी पदाने व्यवहार करणारी ती शक्ती लाघवाने खेळ खेळते.
कृष्णावतार त्यांनी नटविला हे मला मान्य आहे. त्यावेळी पार्थाला सांगितले, “मी पाप पुण्या निराळा ! सुखदुःखा वेगळा ! मज दंड कोण करी?” असे जे म्हटले होते, ते कृष्ण म्हणत नव्हता.
कृष्ण हे ॐकार स्वरूप आकारी होते. पण आकार बोलत होता. तो कशाच्या आधारावर? तो आकार कृष्णा समान झाला होता म्हणून प्रणव बाहेर पडत होते. करणारे तेच आणि निवारण करणारेही तेच आहेत. लाघवी तऱ्हेने खेळ खेळणारेही तेच आहेत. कोणत्या भक्ताला मोकळे सोडले आहे? चुकूनही नाही. रामावतारात १४ वर्षे वनवास काढण्याची काय आवश्यकता होती? कृष्णावतारात ज्याप्रमाणे मानवी बुद्धी फिरत होती, त्याप्रमाणे वळसा घालून हे कर्तव्य करावे लागले. सतासाठी उलटे सुलटे करावे लागले. मानव कृष्णावताराला चांगले म्हणतात ते का? ज्यावेळी वाली सुग्रीव यांचे युद्ध झाले, त्या वेळेला सुग्रीवाला मारण्याची आवश्यकता काय होती? पण त्यामध्ये मुख्य मुद्दा काय आहे हे मानव बघत नाहीत. ते घेत नाहीत. ©️
