नर्मदा निवासी : ज्यावेळी प्रथम आसन स्थापन झाले ते कसे स्थापन झाले?
सद्गुरु बाबा : मुंबईतील कॉटन ग्रीन पासून सुरुवात आहे. लोक विक्षिप्त पण त्यांना मानवात आणले.
नर्मदा निवासी : प्रथम आसन कोणत्या दिशेला होते?
सद्गुरु बाबा : आसन पूर्वाभिमुख होते. आता उत्तराभिमुख आहे.
नर्मदा निवासी : त्यावेळी मानव कसे होते याची आपणाला सर्वस्व गती आहे.
सद्गुरु बाबा : आपल्या मुखातून अमृतवाणी मिळावी ही इच्छा आहे.
नर्मदा निवासी : आपणास कल्पना आहे परंतु आपली इच्छा म्हणून थोडे निवेदन करतो. त्यावेळी मानव होते परंतु त्या मानवात अहंकार भरपूर होता. नाही का ?
सद्गुरु बाबा : अहंकार असेल पण प्रमाण कमी होते.
नर्मदा निवासी : स्वार्थ बुद्धी जास्त होती का?
सद्गुरु बाबा : स्वार्थ बुद्धी कमी होती.
नर्मदा निवासी : सताला मानणारे होते का?
सद्गुरु बाबा : होते. ©️
