एकांत म्हणजे एकाचाच अंत घेणे येणे नाम एकांत !
एकादशी म्हणजे दश इंद्रिये एकात मिलन करणे. एकचित्त समर्थांचे चरणात होणे. दश इंद्रिये अकराव्यात मिलन करणे येणे नाम एकादशी !
आता दश इंद्रिये एकात मिलन होतील कशी? तर ज्या ठिकाणी आपण शरण आहात, तेथे मनाने सर्व अवयव कोंडून ठेवायला हवेत. म्हणजे दश इंद्रिये एकात मिलन होऊ शकतात. म्हणजे ती सदगुरू माऊली स्वतः होऊन आपणच सर्वस्व करीत असते.
पुढें उपवास ! एकादशी उपवास म्हणजे काय? याचे विवरण पुष्कळ वेळा केले आहे हे सांगावयास नको. ©️