Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

आकारा शिवाय निराकाराची गती मिळणार नाही. ©️

आकारा शिवाय निराकाराची गती मिळणार नाही. ©️

रुक्मिणी माता – (आषाढी एकादशी) प्रथमच म्हणावेसे वाटते, आपण ज्यांना परब्रह्म म्हणता, त्याच ठिकाणी माझी मान लवते, त्यांनी (विठ्ठलांनी) सुद्धा तेथे मान लवविली, मग सांगा परब्रह्म कोण? श्री विठ्ठल कि आणि कोणी? माझे कर्तव्य मी करीत आहे. पण एवढेच आहे, जे सर्व भूतेषु पश्य ते सर्व ठिकाणी व्यापक असून सुद्धा अलिप्त आहेत. याची गती मिळण्यासाठी, कोणाची तरी साथ हवी असते. साथ मिळाल्यानंतर त्यांची पाठ सोडू नये.

सगळ्यांनी सांगितले आहे, आकारा शिवाय निराकाराची गती मिळणार नाही. आकाराला धरले की निराकार जाग्यावर येते.

या ठिकाणी सेवेकरीणी आहेत. माझ्या विठ्ठलांना प्रत्येक ठिकाणी मी तक्रार करीत नाही. पतीव्रतेने पतीचे व्रत पाळले नाही तर ती सेवेकरीण कसली? एका महान योगीनीने त्रिगुणांना शरण आणले, तशा आताच्या अनुसया आहेत की नाही कोण जाणे? इतके सांगायचे आहे की, पती हे कोण? त्या ठिकाणी कोण? ते ठिकाण कोणते? या विचारांनी चालले की परब्रम्ह त्या ठिकाणी धावतील. म्हणूनच त्या परब्रम्हाचे वर्णन केले आहे.

नाना जन्माचे अवतार | नाना गौत्र विचार | तोच विचार तू जाण || त्यासाठी मानव सेवेकरी काय जाणणार? म्हणून मूर्तिमंत हा आकार आहे. त्याने अहंकार सोडून वर्तणूक ठेवा. या आसनाचे जे जे सेवेकरी आहेत त्यांना अनुभव आलाच असेल. मग कर्ता करविता कोण? सद्गुरु कोण? मग तुझे माझे का? सद्गुरु कशाचा लोभ दर्शवितात का? मायावी संसाराचा गाडा सद्गुरुच हाकून घेतात. तुम्ही कोणीही ते करु शकणार नाही. तो गाडा ते अनंत तऱ्हेने हाकतात. फक्त कृतिमान राहणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. विठ्ठल हेच माझे सर्वस्वाचे निधान आहे. आम्ही एकमेक एकमेकावर अवलंबून आहोत. ©️

You cannot copy content of this page