Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

आकाराला सोडून तत्त्व नाही…©️

आकाराला सोडून तत्त्व नाही…©️

श्री समर्थ मालिक –

सगुण निर्गुण आहे कसे अन् नाही कसे? जड आहे. स्थूल देह म्हणजे त्याला मानव म्हटले आहे. प्रकृती स्वयं आहे का? तर नाही. मी सगुण आहे, निर्गुण पण आहे. पण कोणाला? जो जाणेल त्याला. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही.

आपल्या नादात गुंग असते ते कोण? जोपर्यंत भिन्नत्व नाही, तोपर्यंतच एकरूप असते, पण मायेची हवा लागल्यानंतरच विसर पडतो. विसर पडल्यानंतर सत् आणि प्रकृती भिन्न होते अन् मग वाटते मी कोणीतरी विशेष आहे. मी अमक्या तमक्याचा आहे. पण ईश्वराचे नाव सांगतो का?

त्याचे सुकृत असेल तरच सत् सानिध्यात येतो. मग त्याला वळण लागते. प्रथम तत्व आणि प्रकृती एकरूप झालेली असते. पण वयात आल्यानंतर एकरूप होणे कठीण पडते. मी सगुन आहे अन् निर्गुण पण आहे. प्रकृती ठायीच लय केल्यानंतर मग मी निर्गुण आहे की नाही? ही शक्ती मिळविण्यासाठी काही वर्षे लोटावी लागतील. सर्व ठिकाणी मी आहे अन् म्हणून आकाराला सोडून तत्त्व नाही. ©️

You cannot copy content of this page