Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

…अशी दशा झाली असती का?©️

…अशी दशा झाली असती का?©️

गुरुदेव पितामह : साधू कोणाला म्हणतात? या दोन अक्षरात किती महान अर्थ आहे, पण या कलियुगी स्थितीत मानव स्थितीप्रमाणे म्हणजे मंत्र, तंत्र सर्वस्वांत बहरलेला म्हणजे तो साधू! पण साधू आणि मुनी यात किती फरक आहे.

साधू कलियुगी स्थितीप्रमाणे मला साध्य कसे होईल हे पाहणारा? या मानवतेत अति अति म्हणजे मोहमायेच्या पाठी धावणारा ! यांना साधू म्हणावे का? तर हे साधू नाहीत. सता ! सत दृष्टीने पाहिले तर ते साधू नाहीत. अघोरी विद्या संपादन केलेले, अघोरातील अंती अघोर मानव आहेत.

या कलियुगी स्थितीत मानवते प्रमाणे मानवता आहे का? तर नाही. म्हणूनच यांना कोणते प्रणव द्यावेत? साधू द्यावेत का संधी साधु?

हेच मानव म्हणजेच स्थितीतील मानव कोणता दृष्टिकोन करीत आहेत. विमानातून पुष्पवृष्टी केली. पण कोणत्या विमानातून? यंत्र युगातील विमान! आमच्या युगात सत कर्तव्य झाल्यानंतर भूतलावर वरून पुष्पवृष्टी होत होती. ते कोण करीत होते तर देव करीत होते.

येथे सत कोण? मानव कोणते? देव कोणते? प्रथम प्रणव दिले कलियुगी स्थिती! त्यात कोणते दृश्य कसे दिसेल हे सांगता येत नाही.

नाशिकमध्ये प्रवेश करण्याचे वेळी एका घाटावर अगोदर गंगास्नानास जाणार. त्यावेळी जे काय करायचे ते पूर्णत्व करून याला कुंभमेळा म्हणतात. पण कुंभमेळा म्हणजे काय? आद्य युगात अशी स्थिती झाली. एक वेळेस आम्ही जे काही सत कर्तव्य करीत होतो त्याची जाणीव कोणाला झाली? तर सर्वस्वाचे पालन पोषण करणारे विष्णू यांनी त्यावेळी एका कुंभातून या गंगेत अमृत ओतले. त्यात स्नान केल्यानंतर कोणती गती प्राप्त होईल हे माहित आहे आपणास. अमृत कोणासाठी दिले तर आम्हासाठी, एक कुंभ भरून त्या गंगेत अमृत दिले, त्यात स्नान आम्ही केले. त्याला किती युगे झाली? तेच अमृत त्या स्थानात भरून राहिले आहे का? जर अमृत स्थिती असती तर अशी दशा झाली असती का? ©️

You cannot copy content of this page