Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

अलख…… प्रवचन (३) ©️

अलख…… प्रवचन (३) ©️

आपल्या दरबारात मायावी ज्योती येतात. आपण म्हणतो की, कर्मसंचित दूर ढकला. तसे नाही. एवढ्या योनीत ढकलले तर, ते आणि हे असे द्वय कर्मसंचित भोगावे लागते. आपले सेवेकरी आजारी असतात. ते कर्मसंचित पुढे ढकलता येणार नाही. पुढे ढकलले तर द्वय संचित भोगावे लागेल. यापेक्षा जे आहे ते तू भोग. जर दूर करावयाचे असेल, तर अखंड नामात दंग हो! धुतल्या तांदळा सारखा शुद्ध रहा. नामामुळे शुद्ध होशील. मी – तू पणा, अहंपणा सर्वस्व विसरशील! नंतर मालकांची जाणीव मिळेल. शेवटी त्यांच्यात लय होशील. आपले सेवेकरी अंती विव्हळता कामा नये. प्रत्यक्ष अखंड नाम, माझे सद्गुरु यांच्यात लय झाला, तर किती चांगले होईल. ‌प्रत्येकाने ओळख ठेवा. सत् मार्गाने चला. कष्ट करावयाचे अगोदर फळाची इच्छा केल्यास ते फळ दूर जाते. मी कष्ट करीन, फळाची इच्छा करणार नाही. अशा तऱ्हेने ज्योत जाईल, तर काय होईल?

अखंड नामात सद्गुरु आहेत. ते नामस्मरण मनापासून न केले तर भीती वाटते. ही ज्ञानाची मूर्ती कशी आहे, याची पाहणी करा. चांगल्या रितीने वागा. याचेपुढे तरी निदान आसनाधिस्तां बरोबर बनवा बनवी करु नका. त्यांना सर्व माहित असते. ते चार माणसांत उघड करणार नाहीत. झालेली चुक कबुल करणे.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page