“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच कर्तव्य झाले आहे. आहे ना कल्पना?(आहे.)
प्रत्येक अवतार कार्यात महान महान मुनिजन झाले. सता आपल्या सानिध्यात कोण आहेत? परमपूज्य गुरुदेव महामुनी वशिष्ठ, पण सता, आपणास कल्पना आहे, प्रत्येक अवतार कार्यात आपले गुरूपद कोणी नटविले? गुरुदेव वशिष्ठांनी, पण सता कधी उच्च प्रणव दिधले का? नाही. कोमल शांत असेच प्रणव दिधले. या मुनीजनांची बरोबरी कोण करू शकेल?
सता, राम अवतारात आपण विश्वामित्राची पूर्ण शक्ती घेतली अन कलियुगी अवतारकार्यात पूर्णत्व नष्ट केले. सता, हेच संदेश आहेत. सता आपल्या सानिध्यातील कलियुगीन कर्तव्य ज्यावेळेस पूर्णत्व होईल, त्यावेळेस मानवांना पूर्णपणे कल्पना येईल.
सानिध्यात असणाऱ्या मानवांना संदेश आहेत, कलियुगी स्थितीतील मानवांप्रमाणे, जी अहंकारी स्थिती आहे, ती त्यांनी पूर्णत्व नष्ट करणे हेच संदेश आहेत. सर्वज्ञ म्हणतात, सता आपण मानवी स्थितीप्रमाणे कर्तव्य करीत आहात. या कलियुगी मानवी स्थितीत कोणती स्थिती आहे? या भूतलावर अतिसूक्ष्म कोण आहे ? तर कीटक आहे. या कीटकाची चिंता कोणाला असते? अर्थातच सताला असते. ©️
