श्री समर्थ मालिक – दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | चोर आणि साव सारखाची || तेव्हा कोणाची कृपा आहे? कोणाची तरी कृपा आहे असे आपणास वाटत असेल तर निवेदन करावयास नको कां? काही चोर पण आहेत, काही साव पण आहेत. काहींनी चोरी केली तर मला त्याची जाण आहे. मी कणाकणात भरलेलो आहे. चोरांना केव्हाही सोडणार नाही. ते नजरेतून सुटणार नाहीत. काहींनी हे प्रत्यक्षात अनुभवले देखील आहे. ज्यांनी अनुभवले नाही त्याना ते माहीत होईल.
दिवा म्हणजे कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. ज्याला तुम्ही शरण गेलात, त्यांनी तुम्हाला प्रकाश दिला आहे. प्रकाश तुम्ही स्वतः घेऊन आलेले नाहीत. तोच दिन, तोच दिवा प्रत्यक्ष घडण घडते ती पाहत आहे. असे असताना सेवेकर्यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे, पण या ठिकाणी जे घडते ते कोणीतरी पाहते हे लक्षात ठेवा.
सेवेकरी बोलून जातो, घडण घडते. कोणीतरी घडवून घेत असते. त्यांचे कर्तव्य ते घडवून घेत आहेत. सेवेकरी हा नामा निराळा आहे. काही सेवेकरी प्रकाशमान आहेत. सानिध्यात गती घेत आहेत. गती घेत असताना, आसनाधिस्त अन माझे बोलणे चालत असताना मीच शहाणा म्हणून त्यांची मान डोलत असते. असे झाले आहे, तेच सांगत आहे. ही घडण मीच घडवून घेतो. ओळखले तर अनेकात तत्व एकच आहे ह्याची जाण मिळेल. त्याही सेवेकऱ्यात मीच आहे अन् दुसऱ्यातही मीच आहे असे जर वाटत असते तर त्यांने तसे केले नसते.©️
