Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

ॐ कार बीज…

ॐ कार बीज…

ज्या आकाराला शरण तेच ॐ कार स्वरूप आहेत म्हणून,ॐ कार बीज मात्रेण | नित्यम् ध्यायंती योगिन: ||कामदम् मोक्षदम् चैव | ॐ काराय नमो नमः ||

ॐ कार हे बीज कसे आहे? तेच ते स्वयं तत्व ॐ कार स्वरूप नटलेले आहे. तेच निर्विकार, निराकार असे आहे. म्हणून आकारातच निराकार आहे. म्हणूनच त्याचे वर्णन होत आहे. ॐ कार बीजाची निर्मिती तिथूनच आहे. ॐ हेच सत् ! सत् तेच ॐ !! यात आमच्यासारख्या अज्ञानी सेवेकऱ्याने त्या सताच्या लीलेचा अंत, महिमेचा अंत घेण्याची काय जरूर आहे? असतील ते अनंत लीलाधारी ! आम्हाला एकच सापडला आहे, ते म्हणजे वेदांच्याही बा धरीले हाती ! म्हणून त्यालाच हाती धरले तर बाकीच्यांची आवश्यकता काय? असे ते सत्, तेच सद्गुरु ! तेच स्वयमेव अखंड आहेत !! तेच ज्योतिर्मय, आकारी व निराकारी ही होऊ शकते. दृश्य आहे तेच अदृश्य आहे पण धरता येत नाही. पाहता येत नाही. कडकडून भेटता येत नाही. असे ते परिपूर्ण आहे. शाश्वत आहे.

जनार्दन म्हणजे जनाला धन, विद्या देणारे, जनांच्या वेगळे असणारे तत्व ! अनंत रूपाने आहेत ते ! एकच तत्व गुरुस्वरूप नटले आहे ! पण प्रकृती भिन्न असल्याकारणाने पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. समदृष्टीने पाहिल्यास एकच तत्व, ॐ कार स्वरूप नटलेले आहे. प्रकृती भिन्न आहे, परंतु तत्व अभिन्न आहे. अभिन्न दृष्टीने पाहिल्यास, एकच तत्व सर्व ठिकाणी विखुरले आहे (हे पाहता येईल). ज्याला मुक्ती मोक्ष पाहिजे असेल, त्याने सत् सोडता कामाचे नाही. या ठिकाणी महान महान विद्वान पंडित आले तरी त्यांना चाचपडावे लागेल, हे ध्यानात ठेवा. म्हणजे या ठिकाणी बोलण्यास सुधरणार नाही. कारण या ठिकाणी सताचा वास आहे. पोपटपंची या ठिकाणी चालणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page