एखाद्या सेवेकऱ्याचा अनुभव, आजच्या दर्शनाचे वर्णन, आजपर्यंत जी सेवा केली त्याचे प्रतिक, त्याचे दर्शन, वर्णन तेच प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात घेऊन सदगुरु चरणांचा लाभ घेत घेत आपणाला कोणत्या ठिकाणी जावयाचे ते लक्षात ठेवणे.
प्रत्येक सेवेकऱ्याने, आपल्या सदगुरुंनी सत् पदाच्या आसनावरून जे अखंड नाम दिले आहे, त्याचेच नामस्मरण करने, त्यात निमग्न राहणे. आपले मालिक आपल्या पाठीवर आहेत ही भावना ठाम ठेवल्यास त्यांना पाहता येईल. त्यांचा ठाव घेता येईल. तशी भावना न ठेवल्यास त्यांना पाहता येणार नाही.
या दरबारची स्थिती फार निराळी आहे. कितीतरी अखंड ज्योती या दरबारात येण्यासाठी तळमळत आहेत. परंतु त्यांच्या कर्मसंचिताप्रमाणे आडपडदे दूर झाल्यानंतर त्यांना तो लाभ मिळणार आहे. काळ समिप आला आहे. उघड होण्याची वेळ आली आहे. ज्यावेळी उघड होईल, त्यावेळी स्थिती फारच निराळी होईल.
या ठिकाणी अखंड तत्व राबत आहे. सेवा, सेवेकरी, सद्गुरु भक्ती ही अखंड सारवण याचा अर्थ फार खोल, फार निराळा आहे. सेवा कोणत्या तऱ्हेची, किती तऱ्हेने सदगुरू सेवा, कोणत्या कोणत्या तत्वाप्रमाणे तन, मन, धन यांच्या पेक्षाही चौथी सेवा अमूल्य आणि मार्मिक आहे. ती सेवा कोणती?
जे मनाच्या पलीकडेही जी शक्ति, त्या शक्तीचे अर्पण सदगुरू चरणांवर असल्याशिवाय सेवा रूजू होत नाही. सेवा आणि सदगुरू याचा अर्थ ज्यांना मान्य नाही, तो सेवेकरी नव्हें. ©️