नर्मदा निवासी: मग आताचे मानव! ते मानवच आहेत ना?
सद्गुरु बाबा : पण ही चौकट त्यावेळी होती ना?
नर्मदा निवासी : आम्ही हे प्रश्न का विचारले? पूर्वी हे आसन पूर्व पश्चिम अन आता दक्षिणोत्तर आहे. त्याच काळात चौकटाने कुरघोडी केली. त्यावेळी बहुतेक मानव अहंकारी नव्हते. या काळात एकही मानव असा सापडणार नाही की त्याच्याजवळ अहंकार नाही. या सर्वस्वाची परिपूर्ण माहिती आहे. आपण प्रत्येक वेळी प्रश्न विचारीत होता आम्हाला नाही, त्या तत्त्वाबरोबर झगडत होता. आपण अनुग्रह दिला तो असा का? त्याचे स्पष्टीकरण करणे. या चौकटाने इतका धुमाकूळ घातला की आम्ही देखील याच परिस्थितीत होतो. तेथून येऊन आम्हीच अनुग्रह दिला.”
सद्गुरु बाबा : आपण मालिक फक्त आमच्या गालाला हात लावला होता.
नर्मदा निवासी : आम्हास कल्पना आहे कोणास कसा अनुग्रह द्यावा. आपली थोडी का परीक्षा घेतली? त्यातून उत्तीर्ण झालात म्हणून एवढी कर्तव्ये झाली. आपल्या प्रमाणे आणखी काही ज्योतींना अनुग्रह दिला. त्यांच्याकडून एवढी कर्तव्ये झाली नाहीत, म्हणून आता त्यांचा शेवट झाला. म्हणूनच आम्ही प्रणव दिला. सेवेकरी अन सद्गुरु! पितामह गुरुदेव, त्रिगुण होते. मग प्रकट का होत नव्हते? प्रथम आपले आदेश आले त्याचवेळी प्रगट झालो व प्रथम येथे आलो ना? ©️
