दरबार हा दरबार आहे. आसन हे आसन आहे ! ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी दरबार आहे. त्या ठिकाणी आसन आहे. स्थुलाचे विवेचनावर पुढे निवेदन होईल. सेवेकर्यांचे सर्वस्व कोडकौतुक पुरविण्यात येईल. चारही देहावर विवेचन करण्याची वेळ आली तर जरूर विवेचन करण्यात येईल.
जशी संघर्षणे होतात, तसे सताकडून आदेश सुटत असतात. जे खेळ खेळावयाचे ते प्रत्यक्ष सत् खेळत नाही. जी लाघवी शक्ति, ती खेळ खेळत असते. काहीही स्थित्यंतरे झाली, उलथा-पालथ झाली तरी सत् ते सतच राहणार आहे. ते एकदा प्रकट झाले की, मग कोणालाही आटोपता येणार नाही. एक जरी सताचा किरण प्रगट झाला तरी तो कुणालाही सहन होणार नाही. आज जरी मायावी कृती दिसली नाही, तरी ती जरूर दिसण्यात येईल.
ज्या वेळेला संघर्षण चालले होते, समुद्रमंथन चालले होते, त्या वेळेला मानवी तऱ्हेने १४ रत्ने काढली. देव दानवांचा झगडा चालला होता. एवढे खरे की, संजीवनी आणि अमृत दोन बाजूला दोन ठेवली होती. ज्यांना सापडले त्यांनी पळविले. दिले कोणी कोणाला? संजीवनी महान विद्या आहे. शुक्राचार्यांनी जे साधले ते बृहस्पतीला साधता आले नाही. जी विद्या शुक्राचार्याला मिळाली, ती त्यांनी जतन केली. त्याने वाढवली. यामुळे दानवांची संख्या घटत नव्हती. म्हणून ती विद्या मिळविण्यासाठी कोणाला पाठवले. कच हा बृहस्पतिचा मुलगा. ज्योत उच्च पातळीची होती आणि त्याच्याकडून कार्य करून घ्यावयाचे होते. म्हणून त्याला पाठविण्यात आले. (समाप्त) ©️