श्री सद्गुरू समर्थ दत्त जयंती उत्सव –
आजचा शुभदिन अवतार कार्यासाठी आहे. एकंदर दोन शुभदिन होय. आपले सेवेकरी कसेही असोत, हा दिवस साजरा करतात. वेडी वाकडी का होईना, सेवा करतात. ती पूर्णत्वाने सत आहे.
आज दर्शनाची मोकळीक आहे. प्रत्येकाने धडपड करा. सत मार्गानें वाटचाल करा. तुम्हीं सत मार्गाने गेल्यास मुक्ती मिळेल. तेव्हा प्रत्येक सेवेकऱ्याने धडपड करा. धडपड करने, प्रत्येक सेवेकऱ्याचा अधिकार आहे.
आज आसनावर अखंड तत्व खडे आहे. कोणीही वर्णन करु शकणार नाही असे तत्व पहाटेपासून आसनावर आरूढ आहे. भक्तांच्या कोड कौतुकासाठी प्रत्येकाला दर्शन दिले जाते. खरे मालिक कसे आहेत, ते कोणीही पाहू शकणार नाही. गेले ते जाणीव रहित झाले.
भक्ती ही साधी आणि सोपी आहे. कोणाला? ज्याची नितीमत्ता शुद्ध, सर्वस्वी सत त्याला सोपी आहे. सत म्हणजे पुर्णांगी सत् !
प्रत्येकाला आदर मिळाला पाहिजे. सद्गुरु लिला, लाघव करतात, परंतु सेवेकऱ्याला दारोदार भिक मागावयास पाठवणार नाहीत, म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने याप्रमाणे वागा. आपल्या सेवेकऱ्याना स्थुलांगी दर्शन देतात. त्याने ते ओळखले पाहिजे. प्रत्येक सेवेकऱ्याच्या ठिकाणीं आज अखंड तत्व आहे. सेवेकऱ्याने ओळखले पाहिजे. जो सेवेकऱ्याचा मान तो सद्गुरुंचा मान होय. सद्गुरु प्रत्येकाच्या हृदयात आहेत. ते कसे? स्व:मायेच्या कवचात दडून बसले आहेत. प्रत्येकाने ओळखण्याची, जाणीव घेण्याची धडपड करणे. आजच्या शुभदिनी प्रत्येकाला शांती मिळेल. पायरीप्रमाणे दर्शन मिळेल. आपल्या दरबारातील सेवेकरी कधीही असत मार्गी जाणार नाहीत. जाऊ देणार नाहीत. दरवर्षी दत्तजयंती साजरी होणार आहे. (पुढे सुरू…….२)©️