Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मी श्रेष्ठ कसा? ©️

मी श्रेष्ठ कसा? ©️

श्री विठ्ठल – मी जर श्रेष्ठ म्हणावे, तर मी कोणाला तरी शरण आहेच. मग मी श्रेष्ठ कसा?

अनंत लाघवी शक्ती आहे. ती लाघव करावयास लागली, तर अंत मिळणार नाही. थोडीशी अहंकाराची झलक आली की असे होते. या अहंकारात ओळख राहत नाही.

ज्याने सृष्टीची रचना केली, ज्याला रंग, रुप, आकार वगैरे काही नाही, सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त असणारे जे परम निधान तत्व, त्या तत्त्वापुढे आम्ही तुच्छ आहोत.

भक्त करणे न करणे हा त्यांचा अधिकार आहे. हल्लीचा काळ फार वेगळा आहे. कारण थोडेसे शिक्षण झाले की त्यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे.

कलीयुगात हवा कशी आहे ते मी सांगतो. हे कलियुग आता कलू लागले आहे. कोणी भक्ताने माझे दर्शन घेतले आहे का? सतभक्त असेल तर त्याला पंढरपुरला येण्याची काय गरज आहे? जो निष्काम सतशुद्ध भावनेने त्या ठिकाणी येतो, त्याला मी अवश्य भेटतो. सकाम गतीने येणारे किती आहेत, तिकडे मी लक्षच देत नाही.

एकच तत्व अनेक नावाने, अनेक रूपाने नटलेले आहे. तेच ते आहेत, आम्ही नव्हेत. जन्माला आल्यानंतर नाव गाव काही नसते. पण नंतर तुम्ही ठेवता. तेव्हा येसी उघडा, जासी उघडा! येताना काही नाही, अन् जाताना पण काही नाही. कांहीतरी सांगाती घेऊन जा. ते काय? याचे शोधन तुम्ही करा. जे जन्मोजन्मीचे सुटत नाही, ते काय आहे, ते आपण सांगा. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page