मी कोठे आहे हे त्यांना डोळस झाल्यानंतरच समजेल. हे सर्वस्व कोण करील? तर आकारच करील. अशा तऱ्हेने ॐ कार स्वरूप बनला की मग सत मार्गाने वाटचाल करील.
काही मानव आड मार्गाने जातात. लोकांना नादाला लावतात. स्वतःचे स्वहित साधतात, पण या ढोंगाने किंवा चमत्काराने मी कधीही सापडत नाही, मिळत नाही. मला रंग, रूप, आकार वगैरे काही नाही. मग मला कसे पकडतील? मला कसे पाहतील? सेवेकऱ्याने हट्टच धरला तर मी दर्शन देतो की नाही? पण कोणत्या रूपाने, हे मी गुप्त ठेवतो. नाही, मी लहान नाही, मी मोठा असा मी आहे. म्हणाल तसा मी आहे. सेवेकऱ्याच्या पात्रतेप्रमाणे सर्व घडत असते. मात्र सेवेकऱ्याने त्याप्रमाणे वाटचाल करावी हे संदेश आहेत.
एकच खुणगाठ बांधणे कि ज्या आकाराला मी शरण आहे, त्याला विसरू नये. ज्या आकाराने खूण दाखविली, त्यांचे दर्शन मिळाले पाहिजे. ज्या आकाराला शरण आहात, तेच आसनावर आरुढ आहेत. मग ध्यान कोणाचे करता?
वाल्याच्या हातात माणसे मारण्याची काठी होती. त्याला पश्चाताप झाल्यानंतर, त्याच ठिकाणी तो बसला. नारदाने त्याला नाम दिले. मग त्या शुष्क काठीला पालवी फुटली. नंतर नारद आणि मी, त्या ठिकाणी गेलो. मी वाल्याला हाक मारली. पण वाल्याने माझ्या हाकेला ओ दिली नाही. नारदाने हाक मारली, तेव्हाच त्याने डोळे उघडले. म्हणून ओळखीचे धीर गंभीर प्रणव कुठून येतात हे सेवेकऱ्याने लक्षात ठेवणे. न पेक्षा महामायेच्या हातात सर्व सूत्रे आहेत. कारण तिला अधिकार दिलेले आहेत. तो अधिकार ती दाखविते. तेव्हा सेवेकर्यांनी फसू नये. ©️
