मालिक प्रत्येकाच्या हृदयरुपी पिंजऱ्यात दडून बसले आहेत. प्रत्येकाच्या हृदयात ते वास करुन आहेत.
मानव म्हणजेच ईश्वर! मग तो कोणत्या रितीने वागतो, कोणत्या रितीने कृती करतो, ती कृती सर्वस्व सत असली, तर सेवेकऱ्यांचाच फायदा आहे. पांच मिनिटे का होइना, सर्वस्व विसरून, एकाग्रतेने, तन्मयतेने मालकांच्या ध्यानात गुंगून जाणे, म्हणजे संचित आपोआप जाईल.
आपली मुले कितीही मोठी झाली तरी आई वडिलांना लहानच दिसतात. तद्वत आपले सेवेकरी कितीही मोठे असले, तरी मालकांना ते लहानच दिसणार! बालकच दिसणार, म्हणून सेवेकऱ्यानो सत मार्गी चला.
आपले गुरू कोण? ज्यांचा आपल्या शिरी हस्त पडला, तेच आपले गुरू होय. ज्यांना आपण पाहणार आहोत, तेच उपदेश करतात. त्यांना पाहण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत ते या हृदयरुपी पिंजऱ्यात आहेत, तोपर्यंत एकदा तरी डोळे भरून पाहण्याचा प्रयत्न करा. या हृदयरुपी पिंजऱ्यातून आत्मा निघून जातो. त्यावेळी नातेवाईक, कोणीही नसतात. जर आपण पुर्णांगी सत मार्गानें गेलो, तर त्यावेळीं फक्त आपले गुरूच त्याठिकाणी असतात. हा अविनाशी आत्मा, कुडीतून बाहेर पडल्यानंतर मालकांच्या बाजूला असतो, मग त्याची हालचाल, धडपड, बोलणे, चालणे सर्व काही बंद होते. अविनाशी आत्मा शांत असतो. शेवट शेवट आपले गुरु कसे आहेत, ते एकदा तरी पहा. तोच मोक्ष किंवा मुक्ति आहे. ज्याला आपल्या सद्गुरुंचे दर्शन मिळाले, तोच धन्य होय. त्यानेच मानवात सत् किर्ती केली असे म्हणता येईल. ©️