श्री समर्थ मालिक –
१) सत भक्तांना काही विषय बहाल केले आहेत. त्या विषयात ते जर रममाण झाले तर दुसऱ्या कोणत्याही विषयांची जरुरी नाही. या विषयासाठी सेवेकर्यांनी किंवा सत भक्तांनी पण लक्ष ठेवणे.
२) सेवेकरी आपली वाटचाल करताना, अघोरांच्या सानिध्यात जातो. अजून काही सेवकऱ्यांचे चुकते आहे त्यांनी सुधारावे, नाहीतर महान गुन्हा समजला जाईल.
३) जोपर्यंत मन शुद्ध होत नाही, तोपर्यंत तो सेवेकरी शुद्ध झाला असे म्हणता येणार नाही.
४) जोपर्यंत सेवेकऱ्याचे मन बाहेर भटकते, तोपर्यंत या दरबारात तो रममाण होणार नाही.
५) काही सेवकरी गुन्ह्याला पात्र आहेत. सत् गतीने वाटचाल करणे कर्तव्य आहे.
६) या आसनाची तीन ताळ, सप्त पाताळ, २१ स्वर्ग देखरेख आहे. सर्व ठिकाणी हे आसन व्यापक आहे. सेवेकरी कुठेही असो, कोणीही असो, शोधला जातो. ©️
