श्री विठ्ठल – हल्लीच्या मानवाला परमेश्वर जगात आहे की नाही त्याची भ्रमंती आहे. जगात ईश तत्व वावरते हे दाखविण्यासाठी अघोर तत्त्वाला तोंडघाशी पाडण्यासाठी त्याला काही ना काही करावे लागते. ज्ञान नसते त्यामुळे अंध:कार निर्माण झाल्यानंतर मर्यादा तुटली जाते. तत्त्वाने डोळे झाकपणा केल्यानंतर सेवेकरी संतप्त होतो, पण संतप्त न होता गोडीने तत्वाशी झगडणे हे अवश्य कर्तव्य आहे. कारण सत् हे कशाचे प्रिय आहे? तर सताचेच प्रिय आहे. मग लिनतेत, नम्रतेत, तुम्ही काहीही म्हणा,
इतकेच, लवचिक प्रेम मर्यादित असते. ते धीर गंभीर असते. त्यांनी दुर्लक्ष केले तर त्रास होतो. म्हणून गोडीने घेतले पाहिजे. गोडीने मायेने घेतले तर मात्र ते तत्व हवे म्हटले ते देण्यास तयार असते. पण हे तत्त्व जे आहे, ते सारखे पाहते आहे, ऐकते आहे, सर्वस्व लक्ष इकडे आहे. ऋषी मुनींनी देखील त्यांची भक्ती केली होती.
आत्ता काय आरडाओरडा गोंधळ होतो. भीतीने भक्ती होणार नाही. आपणाला माहित आहे, काही यात्रेकरू पंढरपूर, काशी अशा ठिकाणी जातात. काशीला जातात स्वयंभू आहे, पंढरीला जातात विठ्ठलाचे दर्शन होण्यासाठी. असे जर आहे तर त्या ठिकाणी रोगराई का निर्माण होते? पण विठ्ठलाला कोणी पाहिले आहे का?
सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे, तर भक्त भिक्षा मागायला जाईल का? लाघव होईल का? तुझे माझे निर्माण होईल का? म्हणून आपण कैवल्य पंथाचे प्रवचन सुरू केले होते. मग सेवेकर्यांनी या पंथाचा अंत घेतला आहे का? कैवल्य पंथ म्हणजे क्षणोक्षणी कला दाखविणारे, कलेकलेने खेळ करणारे, धारणा करणारे, वर्तणूक वाढविणारे, कलेकलेने आता एक अन् क्षणात एक. आज एक तर उद्या दुसरे.
भक्ताला दु:खी करणारे तेच अन् सुखी करणारे ही तेच. हाच कैवल्याचा पंथ आहे. याचा अंत घेण्याचा प्रयत्न करा. मोह जर सद्गुरु पेक्षा तुच्छ मानला, तर सेवेकरी फसणार नाही. सेवेकर्यांनी मोहात गुंतावे पण तो मोह शुद्ध सात्विक पाहिजे. कारण संसार हाच मुळी त्रिगुणी आहे. पण अतिशयोक्ती करू नये. (समाप्त) ©️
