Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

भक्ति – साधी आणि सोपी (४)©️

भक्ति – साधी आणि सोपी (४)©️

कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कोणी काही जरी सांगितले, तरी जो सद्गुरू चरणी ठाम आणि अबाधित आहे, त्यालाच त्याची जाणीव मिळेल. मालिक कोणाचेही ऋणी नाहीत. ज्याच्या त्याच्या कर्मसंचिताप्रमाणे मिळते. अनुग्रहाचे वेळी मालिक कर्मसंचित पहात नाहीत. त्याला गती, प्रकाश देतात. नंतर कां मिळत नाही? असा अविनाशी आत्मा पाहण्याची धडपड केली तर मालिक थोडे कां होईना त्याला यश देतात.

सेवेकरी मनानें पूर्ण शुद्ध असावा, परंतु इतर ज्योतीच्या नादाने घसरत असल्यास अविनाशी आत्मा त्याला टोचणी देत असतात. आपल्या सेवेकऱ्यांचे मोठे भाग्य आहे. पूर्वींच्या ऋषींमुनींच्या मुलांना एकदा धडा दिला की ते तोच गिरवत बसत. हजारों वेळा सांगत नसत. त्यांना अशा तऱ्हेची जाणीव नाही. आपल्या सेवेकऱ्यांना प्रत्यक्ष मालकांचे बोल ऐकावयास मिळतात, अशा त्या स्थुल रुपी आपल्या सद्गुरुंची कोणी जाणीव घेऊ शकेल काय?

आपण ध्यान धारणेला बसलो म्हणजे तेच प्रत्यक्ष पुढे यावयास हवेत. त्यांचे दर्शन मिळते हीच मुक्ती किंवा मोक्ष होय. त्यांचे दर्शन मिळविणाऱ्यास मालिक चुकू देतील काय?

ज्यांचा मस्तकावर पंजा पडला, तेच आपले गुरु होत. बाकी हजार केले तरी त्यांचा उपयोग नाही हे सेवेकऱ्यांने लक्षात घ्यावयास पाहिजे. आपले गुरु काय सांगतात, ते कार्य कसे करतात हे सेवेकऱ्यांने लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागवावयास नको का? सेवेकऱ्यांने कृती करणे व सद्गुरुनी आदेश देणे. ते सेवेकऱ्यांचे हातून होत नाही. सद्गुरू कार्य करणे. आपले सद्गुरू कसे आहेत? तेज प्रकाश कसा आहे? त्यांचे एकदा तरी दर्शन घ्या. ते प्रत्यक्ष स्थुलाने व्यवहार करतात. ओळखता आले पाहिजे. सेवेकरी येथे आल्यानंतर आनंदी असतात. गेल्यानंतर परत मायेत गुरफटतात. मायेशिवाय काय आहे? पण त्याला अर्थ आहे. आपल्या मालकांनी काय सांगितले? त्याचा सेवेकऱ्यांनी विचार करावयास नको का? असे जर विचार जागृत ठेवले, तर मायेत गुरफटले जातील काय?

समाज कार्यात पध्दत एकच! जे कार्य करावयाचे, ते ज्यांनी सांगितले, नेमले, त्यांच्या सांगण्याप्रमाणे कार्य करावयास पाहिजे. समाज कार्य साधेसुधे नाही. पुढे व्याप वाढणार आहेत, तेव्हा आतापासूनच सुधारले पाहिजे. सेवेकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये. मालिक आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. आपण कष्टाने पैसा मिळवतो. तो अनाठायी घालवू नका. मालिक म्हणतात, आपला सेवेकरी म्हणजे सद्गुरु होय. त्याला टोचणी दिली तर तो वळणावर जाईल काय? त्याच्या कानावर बोल घुमले पाहिजेत. म्हणून बोल काढावे लागतात. सर्वस्व सेवेकरी समान आहेत. अमुक जवळचा आहे असे काही नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page