Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

बोध – श्री समर्थ मालिक ©️

बोध – श्री समर्थ मालिक ©️

अखंड सत् तत्वाची गती ज्यानी मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण त्या सेवेकऱ्याची कृती सत् पाहिजे. ती कोणत्या तर्‍हेची पाहिजे? मी सत् किती करतो, असत किती करतो, मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून उजाळा करणे, म्हणजे बुद्धीला सत चेतना मिळते, याला म्हणतात बोध !

ज्याने अखंड पदाची माहिती दिली, ते तत्व कोणते आहे, हे सेवेकऱ्यानी अद्याप पर्यंत आपल्या ध्यानात घेतले नाही. मनाला जी कलाटणी मिळते, त्या कलाटणीला बाजू देऊन वाटचाल करणे.

मला रंग ना रुप, वास ना गंध, मग आकार कोणी द्यावयाचा? ज्यांनी खूण दाखविली, त्याचाच आकार द्यावयाचा असतो. करतो कोण? करविता कोण? करून घेणारा कोण? व्यवहार चालतो कशापासून? इतकेच की, मी माझे अंग दाखवत नाही. मायेकडून कार्य करून घेतो. (पुढे सुरु…..२)©️

You cannot copy content of this page