Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

बोध – भाग तीन ©️

बोध – भाग तीन ©️

भक्तिला प्रथम प्रेम पाहिजे. भाव पाहिजे. पण तो कसा पाहिजे? तर शुद्ध स्फटिकासारखा पाहिजे. प्रेम पाहिजे. रसना ओलावल्या मग त्याच अमृतमय होतात. पण त्याला प्रकृती कशी हवी? हे कशाने होईल? कसे होऊ शकते? रसना ओलावण्याकरिता काय पाहिजे? याला स्वतःचा पाया, घर मजबूत पाहिजे. प्रकृती शुद्ध पाहिजे. प्रकृती शुद्ध झाल्यानंतर मग वेळ आहे का? भूमी शुद्ध नसेल तर रसना ओलावणार नाहीत. म्हणून प्रथम प्रकृती शुद्ध पाहिजे. तेव्हा समर्थ प्रकृती पाहूनच आपल्याला आपल्या सानिध्यात घेतात. नाहीतर सानिध्य मिळणे दुरापास्त आहे.

त्या ठिकाणी वळल्यानंतर बाकी काय राहते? शुद्धात शुद्ध मिसळल्यानंतर अशुद्ध राहील का? अशी दृष्टी मंगलमय झाल्यानंतर सर्वत्र समर्थांना पाहू शकतात. असे दिसत असताना सेवेकऱ्यांना थोडी हुक्की येते. मग हा सेवेकरी असा कधी होईल बरे?

आर्यवर्ता पासून जे महान सतपुरुष होऊन गेले ते एकमेकांची टिंगल करीत नव्हते. सर्वस्व मंगल या ठिकाणी रममाण करण्याचा प्रयत्न करा. सकळ इंद्रिये ब्रह्मरूप झाली तर बाकीचे काय उरले? मग सत् आणखी वेगळे आहे का? म्हणून तुम्ही विचार करा. सेवेकरी कसा पाहिजे? त्याची पात्रता कोणती पाहिजे? अजून सेवेकरी पूर्ण झालेले नाहीत. म्हणून सेवेकर्‍यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page