Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

प्रबोध सताचा…©️

प्रबोध सताचा…©️

हल्लीच्या सेवेकर्‍यांना विशेष वाटते ते कसे? प्रथम त्या ठिकाणी चमत्कार पहावयास मिळाले, आता ते होत नाहीत. पण सेवेकरी म्हणतात, काहीतरी करा. इतकेच सांगत आहे की, कर्तव्य होईल पण थोडा अवधी आहे. धीर धरा. माझ्या सताला, सद्गुरुंना आम्ही ज्या प्रकृतीला शरण आहोत, त्यांना त्रास होऊ नये, ही इच्छा आहे. पण तुम्ही एकच, ठाम असाल तर ते कर्तव्य आपोआप होईल. चिंता नको.

अखंड तत्व कोठे आहे, त्याचा वावर कोठे आहे, हे आपणाला कळलेच असेल. सेवेकऱ्यांनो ठाम श्रद्धा, अढळ विश्वास, दृढ: निश्चय असल्यास सर्वस्व होते. डळमळीत असल्यास काही होणार नाही. म्हणून ठाम व अखंड श्रद्धा ठेवा. वाट भुलता कामाची नाही हे सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे.

त्या ठिकाणी काहींची मनोभावना आहे, पूर्वी होते पण आता काही नाही. पण या ठिकाणी हे ठाम आहेत. याची कल्पना इतर मानवांना नाही. आजच्या या बोलावरून काय आहे ते पहा अन् त्याप्रमाणे वाटचाल करा. भुलू नका. शंका धरू नका. सत् भक्तीला ऋध्दी सिद्धी, तंत्र मंत्र काही लागत नाही. जादूटोण्याची आवश्यकता नाही. आले आले अन् गेले गेले हे सत् भक्तीत नाही. नजरबंदीचे खेळ नाहीत. अघोर मानवाच्या कर्तव्याचे फळ अस्थिर असते. तेच त्यांना मिळते. पुढे काय करायचे ते व्यापक शक्तीच करते. ते मानवांच्या हातात नाही.

सेवेकऱ्यांनो, हे तुमचे अखंड नाम अमृतासारखे टिकविण्याचा प्रयत्न करा. हेच माझे संदेश आहेत. पूर्वीप्रमाणे आता कस नाही. अहंकार हा आज ना उद्या मला खतम करावाच लागतो. क्रोधाला मारावयाचे, एका क्षणात मारू शकतो, पण त्याच्या पायऱ्या आहेत. मानव अहंकाराने बरबटला तर तोच अहंकार त्याला मृत्यूच्या खाईत लोटतो. तो लोटला जातो. ते कसे होते, तर करून घ्यावे लागते. करून घेतल्यानंतर तो आपोआप त्या खाईत लोटला जातो. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page