Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

नाना जन्माचे अवतार…©️

नाना जन्माचे अवतार…©️

रुक्मिणी माता – (आषाढी एकादशी) परब्रम्ह तत्त्वाच्या (आपण ज्यांना परब्रह्म म्हणता) याच ठिकाणी माझी मान लवते, त्यांनी (विठ्ठलांनी) सुद्धा मान लवविली, मग परब्रह्म कोण? म्हणून माझे कर्तव्य मी करीत आहे. पण एवढेच आहे, जे सर्व भूतेषु पश्य ते सर्व ठिकाणी व्यापक असून सुद्धा अलिप्त आहेत. याची गती मिळण्यासाठी, कोणाची तरी साथ हवी असते. साथ मिळाल्यानंतर त्यांची पाठ सोडू नये.

सर्वांनी सांगितले आहे, आकाराशिवाय निराकाराची गती नाही. आकाराला धरले की निराकार जाग्यावर येते. या ठिकाणी सेवेकरीणी आहेत. माझ्या विठ्ठलाला प्रत्येक ठिकाणी मी तक्रार करीत नाही. पतीव्रतेने पतीचे व्रत पाळले नाही तर ती सेवेकरीण कसली? एका महान योगीनीने त्रिगुणांना शरण आणले, तशा आताच्या अनुसया आहेत की नाहीत कोण जाणे? इतके सांगायचे आहे की, पती हे कोण? त्या ठिकाणी कोण? ते ठिकाण कोणते? या विचारांनी चालले की परब्रम्ह त्या ठिकाणी धावतील. म्हणूनच त्या परब्रम्हाचे वर्णन केले आहे.

नाना जन्माचे अवतार | नाना गौत्र विचार || तोच विचार तू जाण. ते मानव सेवेकरी काय जाणणार? म्हणून मूर्तिमंत हा आकार आहे. त्याने अहंकार सोडून आपली वर्तणूक ठेवा. या आसनाचे जे जे सेवेकरी आहेत त्यांना अनुभव आलाच असेल. मग कर्ता करविता कोण? सद्गुरु कोण? मग तुझे माझे का? सद्गुरु कशाचा लोभ दर्शवितात का? मायावी संसाराचा गाडा सद्गुरुच हाकून घेतात. तुम्ही कोणीही नाही. तो गाडा ते अनंत तऱ्हेने हाकतात. फक्त कृतिमान राहणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. विठ्ठल हेच माझे सर्वस्वाचे निधान आहे. आम्ही एकमेक एकमेकावर अवलंबून आहोत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page