आपण जे पाहतो, ओळखतो, देवाण-घेवाण करतो, मायेने व्यवहार होतो. ही सर्व दृश्य दृश्यांची गती आहे. दृश्याला याची आवश्यकता आहे. जो आत वास करतो कि ज्याच्यामुळे आपण युक्ती लढवतो, पैसा मिळवतो, त्याला विसरुन हे धन माझे आहे असे म्हणतो. चांगल्या तऱ्हेने अगर वाईट मार्गाने सुद्धा धन मिळवितो, पण त्याला पूर्णत्वाने जाणीव असते की मी कोणत्या तऱ्हेने धन मिळवतो.
जो नीतिमत्तेने वाटचाल करतो, त्याचे मन शुध्द शुचि:र्भूत राहते. त्याचे आचार, विचार, धारणा सर्वस्व शुद्ध असतात. दृश्य दृश्यांच्या गतीने जातात. त्यांच्या मनाची ठेवण सत् शुध्द, शुचि:र्भूत असेल तर अविनाशापर्यंत जाता येते.
आपण सर्वस्व सगुण साकार आहोत. तेव्हा साकारानेच निराकारापर्यंत जाण्यासाठी आपले मन शुद्ध पाहिजे, पण ते राहत नाही. शरीराला भाळणारे, धनाला भूलणारे पुष्कळ आहेत. धनाची आवश्यकता आहे, पण ते धन नीतीने कमविलेले असले पाहिजे, अनितीचे धन नको. धन जरी मिळते तरी ते आपल्या संचिताप्रमाणेच मिळते.
सत् मार्गी, नीती युक्त ज्योत धनाची योजना सत् पात्रीच करते. पण काही ज्योती अशा बदमाश असतात की, दुसरे सत् गतीने चाललेले त्यांना पाहवत नाही. त्यांना ते आपल्या गोतावळ्यात कधी येतील याचा ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच मार्गी ज्योतीला, चकवून तो आपल्या सारखा बनवितो. तेव्हा अशा मानवांपासून सावध राहणे. ©️