Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

देही अन् विदेही ©️

देही अन् विदेही ©️

श्री विठ्ठल – देही अन् विदेही बनवितो कोण? अज्ञानी मानवांना हे काही समजू शकणार नाही. सत तत्व जे आहे, ते फार दयाघन आहे. जडत्वाने नटलेल्या मानवांना ह्याचे पूर्वीचे गाठोडे पाहून सानिध्यात घेतले आहे. कोणत्याही मानवाची मनोभावना असते, भक्ती करतो, नामस्मरण करतो, ते मी करतो. यातूनही परमेश्वर मला भेटत नाही, म्हणून परमेश्वर हे तत्व कोठे आहे अन् कोठे नाही हे त्या अज्ञानाना कळले असते तर ते भटकत फिरले नसते. याचे ज्ञान नाही म्हणून, काशी, बनारस, मथुरा, प्रयाग इकडे तिकडे भटकतो. पंढरीला जातो. आणखी दुसरीकडे जातो. दत्ताच्या ठिकाणी जातात. पण दत्त कोण हे त्याला कळले नाही. कोणाच्या सत्तेने जातो, हे पण त्याला कळलेले नाही. मला पण कळत नाही. मानवाला याची गती मिळाली, तर पंढरी सोडून मी येथे आलो ते खरे की खोटे याची गती मानवाने घेतली पाहिजे. बरे, मी या ठिकाणी आलो ही गती ज्ञानवंतानी घेतली. तर हे ज्ञान मिळते कुठून? तर सद्गुरु कृपेने ते मिळते. मग या रस्त्याने जाणारे सेवेकरी, ज्ञानरूपी दरीत घुसल्या नंतरची ही जाणीव आहे. पण पंढरीला येतात त्यांनी मला पाहिले आहे का? अंधश्रद्धेचेच लोक जास्त असतात. काही लोक मूर्तीच्या दर्शनासाठी लोकांचे सोटके खातात. काही तर पुढे पण येत नाहीत. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जास्त गर्दी असते. धक्का बुक्की होते, मार खावा लागतो. पण विठ्ठल कुठे आहेत, हे कोणी पाहिले आहे का? मग जर हे कळत नाही, मग माळा घालण्यात अन तिला लावण्यात अर्थ तरी काय आहे? उपयोग काय? जितके माळ घालणारे, ते एकून एक शुद्ध नाहीत. ©️

You cannot copy content of this page