Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

ज्ञानाची मूर्ती (१) ©️

ज्ञानाची मूर्ती (१) ©️

ज्ञानाची मूर्ती म्हणजे कोणती मूर्ती? कोणते नांव? असा अविनाशी आत्मा म्हणजे स्वयम् प्रकाश ! त्यालाच पाहिले पाहिजे !

आपल्या शरीर रुपी पिंजऱ्यात कसे आरुढ आहेत याची जाणीव सेवेकऱ्यांनी घ्यावयास पाहिजे. जाणीव घेतल्यानंतर याच मार्गाने ज्योत गेल्यानंतर, पायरीने मग ते मालिक कसे आहेत, त्यांना आकार आहे कां? ते कोणत्या तऱ्हेने आहेत ते सांगतील.

मालिक प्रगट करुन सांगतात. पण केव्हा? सेवेकरी या मार्गाने जातील तेव्हा ! तो एकच मार्ग ! त्या मार्गाने प्रत्येकाने चालावयास पाहिजे. हे आपले सद्गुरू, मालिक, ते आपल्या सेवेकऱ्यांचा कस घेतात. तो कसा? सेवेकऱ्यांस जाणीव राहत नाही. ज्यांच्याशी हसत बोलतात, त्यांचाच कस असतो. जरी मालकांनी कस घेतला, तरी त्या सेवेकऱ्यांस दुसऱ्यांच्या दाराशी पाठविणार नाहीत. तो वाईट असो, कसाही असो. सुधारेल. जर पाठविले तर इतर ज्योती सहज विचारतील तू कुठे जात असतो? तर सद्गुरू दरबारात ! मग सेवेकऱ्यांची अब्रु जाणार नाही कां? सेवेकऱ्यांची अब्रु गेली म्हणजे मालकांची जाते.

अगदी सानिध्यातील ज्योत असली, तरी तिला मान जास्त नाही. सर्व सारखे ! सर्वांना मान सारखाच ! प्रत्येकाच्या अंतरी अविनाशी आत्मा आहे. कांहीना वाटते, सानिध्यात म्हणून बाबा त्यांना विचारतात. पण त्यांचे ठिकाणी भेदभाव नाही. सर्वांना सारखेच वागवतात. माझ्या बद्दल बाबा कां बोलतात? तू सरळ मार्गाने जावे म्हणून सांगतात ! केवळ आपल्या सेवेकऱ्यांस वाचविण्यासाठीच प्रयत्न करतात. वेळोवेळी टोचणी ही सुधारण्याकरीता देतात. सेवेकरी सुधारला तर दुसऱ्या ठिकाणी सहज मान मिळतो.(Cont..2)©️

You cannot copy content of this page