Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जे अखंड आहे, त्याची निर्मिती नाही ©️

जे अखंड आहे, त्याची निर्मिती नाही ©️

हिमालयात बसवले तेव्हा भगवी वस्त्रे होती. म्हणून हे कर्तव्य इतरांकडून होणार नाही. त्यामुळे हिमालयातून कोकणात पाठविले. आपण मला ओळखले, मी तुम्हाला ओळखले ! यातील सेवेकर्‍यांची तितकी पात्रता नाही. यांच्याकडून टोलवा टोलवी ही होणारच. ही अशी तऱ्हा आहेच. या मानवी सेवेकर्‍यांची तितकी पात्रता नाही. सेवेकरी असे बनले तर आपणाला त्रास होणार नाही.

परब्रम्ह तत्व आपल्या ठायीच सर्वभूतेषु भरलेले आहे अन् भरून सुद्धा अलिप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा आहे. पण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय थांग लागणे कठीण आहे. आकाराला पुजल्याशिवाय निराकाराची ओळख होणार नाही. जे आकारी आहेत, त्यालाच ॐ कार स्वरूप हे नामाभिधान आहे. याची वाढ कोणी करावयाची? मानवी तऱ्हेने त्रास झाला तर असं ना जवळ सांगता. पण कृतीमान असेल तर सांगण्याची आवश्यकता होईल का? म्हणूनच जे अखंड आहे, त्याची निर्मिती नाही. ते धावत नाही, सापडत नाही, कोणी म्हणतात हवा आहे, कोणी म्हणतात गंध, पण शक्ती किती आहे याची गणना कोणी केली नाही. हवा म्हणजेच प्रणव ! अन् हे ब्रह्म आकारी तसेच निराकारीही होऊ शकते. तो त्यांचा अधिकार आहे. पण सेवेकर्‍यांची पाहण्याची ताकद आहे का? जोपर्यंत सेवेकर्‍यांनी आसनाधिस्तांना ओळखले नाही, तोपर्यंत सेवेकरी असेच लुडबुड करणार ! आपण शुद्ध स्फटिकासारखे असल्यानंतर मग त्रास होईल का? हे सेवेकर्‍यांनी ओळखावे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page