Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

जाण घ्या, त्या निर्मात्याची…©️

जाण घ्या, त्या निर्मात्याची…©️

श्री समर्थ मालिक – मानव मनाने, अहंकाराने काहीतरी बोलतो, पण मुळातच त्याला तत्त्वाची म्हणा, माझी म्हणा गती नाही, तर पुढे तो काय सांगणार? मानवाची उत्पत्ती कोणी सांगितली आहे का? याची मूळ मेख मानवांना माहित नाही. मी व्यापक आहे ही जाण त्याला आहे. त्याला गती आहे, पण जाण त्याला नाही. तो काहीतरी बरळणारच! विद्येने पारंगत जरी झाला, तरी त्या विद्येने तो हुरळतो. त्यामुळे त्याचे माझ्याकडे दुर्लक्ष होते. त्याला त्याच्या पूर्व जन्माप्रमाणे सर्व देऊन टाकलेले असते, म्हणून त्याला माझी आठवण नाही.

ज्यावेळी या पृथ्वीवर काही नव्हते, मग हे उत्पन्न झाले कसे? कोणी केले? याचा कर्ता कोण ? मानवाचे जगताच्या पृष्ठभागावर अस्तित्व असावे म्हणून हे केले. मी जगात वावरतो याचा उहापोह कोणी केला असता? एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे.

ओंकार बीज कसे निर्माण झाले कोणी फेकले? याची गती मानवाला आहे का? मग ओंकार फेकल्याशिवाय पसारा झाला नाही ना? ओंकार रुपी मायेच्या आतमध्ये माझा वास आहे,‌ मग ती कोणतीही माया असो. सर्व योनीमध्ये माझा वास आहे. प्रकृती कशासाठी नटवावी लागली? कर्तव्य कर्माचे हित व्हावे. त्याचप्रमाणे प्रकृती नटवून त्याच्याकडून कर्तव्य करून घ्यावे लागते. व्यक्ती तितक्या प्रकृती. कोणाला तिखटाची, कोणाला साखरेची तर कोणाला अमृताची गोडी असते. प्रत्येकाची मनोदेवता वेगवेगळी आहे. मातीचे भांडे दह्याला, दुधाला आणखीन कशा कशाला जाते. तशी मानवाची स्थिती आहे. ऋद्धी-सिद्धी, चमत्काराने मी सापडलो आहे का? कृष्णावतारात मी सांगितले की, मी अनंत नामाने नटलेलो आहे, अनंत रूपाने नटलेलो आहे. प्रत्येकाने आपआपल्या परीने सांगितले आहे, पण हल्लीचे मानव फार शहाणे आहेत, म्हणून येथून पुढे काय होईल, हे सांगता येणार नाही. वारा येईल तशी मानवाने पाठ दिली पाहिजे. सेवेकर्‍यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. झळ जरी लागली, तरी सहन करा. सहनशीलता ठेवा. या भारतामध्ये अघोर तत्व फारच उन्मत्त झाले आहे. ते उन्मत्त झालेले तत्त्व, अहंकाराने बरबटलेले आहे.©️

You cannot copy content of this page