Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

“गु” अन “रु” = गुरु ©️

“गु” अन “रु” = गुरु ©️

श्री विठ्ठल (पंढरपूर निवासी) – “गु” अन “रु” हा फार मोठा गहन विषय आहे. “गु” आणि “रु”, हे एकमेकावर अवलंबून आहेत. आता गु हे दर्शक आहे, रु दर्शकाला धरूनच अदृश्याचा अंत लागत असतो. गुरुचरण म्हणजे सर्वस्वाचे मूळ आहे. तेच सगुण आहेत अन तेच निर्गुण पण आहेत. एकच तत्व अनेक रूपाने नटलेले आहे, याची गती समस्त मानवांना आहे असे मी म्हणू शकत नाही. ज्याने मार्ग आक्रमण केला, त्यालाच गती आहे. काही मानव पूर्व संचिताप्रमाणे, या ठिकाणी आलेले आहेत, अन आणखीन येणार आहेत.

मायावी अंगाचे दर्शन जरी झाले तरी चरणाचे दर्शन होण्यास वेळ लागतो. प्रथम काय म्हटले आहे, आकाराशिवाय निराकाराचे दर्शन नाही, गती मिळत नाही. सगुण धरूनच निर्गुणाप्रत जायचे आहे, म्हणून सगुण उपासना प्रथम! अन त्याला धरूनच जायचे आहे. चरण हे सगुण आणि निर्गुणाचे पण आहेत. हे चरण कोठे नाहीत, याचा ठाव ठिकाणा मिळणार नाही, म्हणून वाटाड्या वाट दाखवतो, पण जाणारा जर आंधळा असेल तर त्याचा काही उपयोग नाही. मात्र मानव त्याप्रमाणे असतो म्हणून आमच्याकडूनही त्याप्रमाणे घडले आहे. ©️

You cannot copy content of this page