Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

कृपा संपादन करण्यासाठी काय करावयास पाहिजे? ©️

कृपा संपादन करण्यासाठी काय करावयास पाहिजे? ©️

सेवेकरीआपली कृपा संपादन करण्यासाठी काय करावयास पाहिजे?
ज्ञानेश्वर – काय करावयास पाहिजे म्हणजे ती गती मिळेल? ईश्वर ही चीज काय आहे याची अद्याप जाणीव घेतली नाही. चैतन्य शोधण्यासाठी कोणाचा तरी हात धरावा लागतो. काठी निर्माण करावी लागते. ती काठी धरून तिथपर्यंत जावे लागते. मानवी अवताराचे मर्म यातच आहे. ते मिळाले की मग वेळच नाही. ते मिळविण्यासाठीच आपण आलेलो आहोत. फार मोठे ओझे नाही. एकाग्र मनाने प्रयत्न केल्यास हे मिळेल.

मन एकाग्र होणे फार कठीण आहे. मग काठी शोधणे त्याहून पुढचे आहे. आपण सत् शुध्द भावनेने त्या जगत् नियंत्याला पाहण्याची इच्छा प्रदर्शित केलीत. तिच्यासाठी वाटचाल चालवली आहे. एक संदेश आहे, “जी काठी शोधावयाची ती राज मार्गानेच जाणारी शोधा. इतर मार्गाची शोधली तर मानव त्यातच गुरफटतो. मग त्यातून बाहेर पडणे किंवा निघणे फारच दुरापास्त आहे. खाली, वरकरणी, वरवरच्या देखाव्याला भाळून चालणार नाही.

मनुष्य या गतीने वाटचाल करतो पण, अंत:र्गती शोधावयास पाहिजे. ती एकदा मिळाली की मग वेळ नाही. बोलविता धनी फार वेगळा आहे. तुम्ही आम्ही काहीही नाही. कार्याला पाठविणारा फार वेगळा आहे. आम्ही फक्त निमित्ताला कारण आहोत. तेव्हा याप्रमाणे अनुसंधनाने मानवाने वाटचाल करावी. (समाप्त)©️

You cannot copy content of this page