श्री समर्थ मालिक – काही लाटा येणार आहेत. त्या लाटेत काय होईल हे सांगता येणार नाही. या लाटा त्यांच्या (सताच्या) संदेशाने सुटणार आहेत म्हणून सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. या बिकट परिस्थितीत मानव फार चिरडले गेले आहेत. याच्याबद्दल काही मानवांना त्याची गरज नाही अन् फिकीर पण नाही. त्यामुळे हा विचार व त्याचे मंथन, दोन्ही आसनावरून चालले आहे.
क्षिराब्धींना आसन आहे अन् या ठिकाणी नाही असे कोण म्हणेल? प्रत्यक्ष कोणाला पाहिजे असेल तर त्याने पाहावे. मानव अंगाने बसणारे त्यांना दिसण्यात येत नाही. प्रकृती ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय दिसणार नाही.
आपले म्हणणे काय? मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते, म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला सुद्धा त्याचा दुरुपयोग करता येणार नाही. त्यांना ते कर्तव्य उद्या परवा केलेच पाहिजे, हा आदी अंतापासूनचा सिद्धांत आहे. आधीच्या काळापेक्षा आत्ताचा काळ फार न्यारा आहे. त्यासाठी कर्तव्य लवकर व्हावे असे आपले म्हणणे आहे. त्यांचेही म्हणणे बरोबर आहे. ©️
