Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

असे होणार, तसे होणार…©️

असे होणार, तसे होणार…©️

असे काही विचार करीत बसाल की असे होणार, तसे होणार हे म्हणणे साफ चुकीचे आहे. पांडवांसारखे जीव:श्च कंठ:श्च दुसरे कोणी नव्हते. त्यानां सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झळ लागली. ती त्यांनी सहन केली. त्यानंतर कौरवांचा नाश करण्यात आला. हे का करण्यात आले? कौरव पांडव हे नातलगतच होते. कौरवांची बुद्धी सात्विक का झाली नाही? का होऊ शकली नाही?

ज्यांची कृती सात्विक असेल तेच सात्विक होतील. कौरवांची भावना शुद्ध नव्हती म्हणून वृत्ती पालट झाली नाही. अहंकाराने बरबटलेल्या त्या ज्योती होत्या. त्यांना वाटत होते की आम्ही कोणीतरी विशेष आहोत. त्यांना माझी गती का मिळू नये? कारण ती पात्रता कौरवांजवळ नव्हती. त्यांचे समत्व बुद्धीने मिटले असते तर मला मध्ये पडावे लागले नसते. पण पांडवाना काही द्यावयाचे नाही असे त्यांनी ठरविले होते.

सत भक्तीने चाललेले असताना त्यांना काहीच द्यावयाचे नाही, असे त्यांनी म्हटल्यानंतर मी पांडवांची बाजू उचलून धरली, पण भक्त त्या पात्रतेचे पाहिजेत. पृथ्वी सर्वस्व धगधगली आहे. तिच्या डोईवरचा भार कमी केलाच पाहिजे. अन् तो करावयास हवा. काळ जवळ जवळ येत आहे. ही गदा कोणावर फिरणार, हे मला आत्ताच सांगता येणार नाही आणि काही सांगण्याची आवश्यकताही नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page