Walaval / वालावल
कुडाळ तालुक्यातील वालावल गावांतील चौधरी वाडीतील श्री नारायण चौधरी कुटुंबात आपल्या श्री सद्गुरू माऊलींचा जन्म झाला. हाच तो ॐ कारांचा सव्वीसावा (26) अवतार होय.
आपले बाबा अर्थात आपली श्री सद्गुरू माऊली ही महाबळेश्वर येथील एका भक्ताच्या ठिकाणी भेटीला गेली होती. तेथून परतल्यावर सर्वज्ञांनी आपल्या एकचित्ततेच्या संदेशात सांगितले की सातारा येथे आपली बरीचशी सात्विक गुरूकुलें आहेत व त्यांच्यासाठी तेथे आसन स्थापण्यात यावे. इतकेच नव्हे तर कोकणात देखील आपल्या जन्मस्थानी कोकण आश्रमाची स्थापना करण्यात यावी.
दिनांक: 21 मे 1964 रोजी या आश्रमाची स्थापना झाली त्याला कारण कोकणातील गुरूकुले, ऋषीमुनी, योगी-योगीनी व मुख्यत्वे करून गुरूदेव पितामह म्हणजेच रामावतारातील रामायण कालातील महामुनी वसिष्ठ गुरूदेव पितामह होत. यांचा त्या काळातील आश्रम हाच या कलीयुगी अवतार कार्यातील आपल्या श्री सद्गुरूंचे अर्थात ॐकारांचे जन्मस्थान होय.
या आश्रमाच्या परिसरात जवळच महामुनी अगस्त्य किंवा अगस्तींचे वास्तव्याने पावन झालेला कुपीचा डोंगर, धौम्य महामुनींचे वास्तव्य असलेले धामापूर, देवबाग आणि गुरूदेव पितामहांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व आपल्या माऊलींनी सव्विसावे अवतार कार्य येथे नटवून परम् पवित्र झालेला आपला वालावलचा कोकण आश्रम !
श्रीराम प्रभूंच्या अवतार कार्याच्या वेळी, प्रभू श्रीरामचंद्रांचे सद्गुरु होते, श्री पितामह वसिष्ठ गुरुदेव. ह्याच पितामहांचा त्यावेळचा जो आश्रम होता, तोच आश्रम आता ह्या ॐ कारांच्या सव्वीसाव्या अवतार कार्यात आपल्या श्री सद्गुरु माऊलींचे जन्मस्थान म्हणून पुन्हा एकदा, या कलियुगात माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. विशेष नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या अवतार कार्यात देखील पितामह वसिष्ठ गुरुदेव आपल्या श्री सद्गुरु माऊलीं बरोबर ह्या अवतार कार्यात प्रत्यक्ष कार्यरत असून, आपणा समस्त भक्तगणांस माऊलींच्या अवतार कार्य संपन्नतेच्या पश्चात देखील माऊलींच्या सांगण्यावरून बोधपर मार्गदर्शन अव्याहतपणे करीत आहेत.