Satara / सातारा
माऊली महाबळेश्वर येथे एका भक्ताच्या ठिकाणी भेटण्यास गेली होती, तेथे जाऊन आल्यावर मालकांनी (सर्वज्ञ) एकचित्तामध्ये संदेश दिले होते की सातारा येथे आपली, सताची अनेक गुरूकुलें आहेत व त्यांच्यासाठी तेथे आपल्या सद्गुरू आश्रमाची स्थापना करावयास हवी.
त्यातच सातारा येथील श्री विवेक मुनी यांनीही सताजवळ येणे आपल्या श्री सद्गुरू माऊलींकडे सातत्याने आग्रह धरला की येथे आम्हा गुरूकुलांसाठी सताचे स्थान असावे आणि या इच्छेखातर व मालकांच्या संदेशानुसार ११ मे १९६१ ला गांव: इंगळेवाडी, तालुका: सातारा, जिल्हा: सातारा येथे सातारा आसनाची स्थापना करण्यात आली.
आजूबाजूचा परिसर जसे कृष्णा-वेण्णा संगम, कराड येथील कृष्णा-कोयना संगम, अजिंक्यतारा गड, श्री रामदास स्वामींचा सज्जनगड, थंड हवेचे ठिकाण पांचगणी आणि महाबळेश्वर, औंध संस्थान इत्यादी इतिहास प्रसिध्द स्थानांनी वेढलेला हा परिसर म्हणजे ऋषीमुनींच्या वास्तव्यासाठी प्रसिध्द असलेला परिसर होय. त्यामुळे अशा या पावन पवित्र भूमीत सताचे आसनाची स्थापना म्हणजे दुग्ध-शर्करा योगच होय.