Malad / मुळाश्रम मालाड
कोकणातील वालावल क्षेत्री, चौधरी कुटुंबात ओंकारांच्या २६ व्या अवतार कार्याचा प्रारंभ झाला. वालावल क्षेत्री जन्म म्हणून ते स्थान जन्मस्थान झाले. पूर्वाश्रमीचा रामावतारातील पितामह वसिष्ठ गुरुदेवांचा हाच आश्रम, आताच्या ॐ कारांच्या २६ व्या अवतारातील वालावल किंवा कोकण आश्रम म्हणून ओळखला जातो.
मुंबई मालाड येथील मूळ आश्रम म्हणजेच माऊलींची घरकुल अर्थात संसार गृहस्थिती ! पूर्वाश्रमीचे हे वास्तव्य स्थान म्हणजे एक पर्णकुटीका होती. पुढे पुढे त्यात बदल होत जाऊन, आत्ताचे हे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले व मुळाश्रम या नामाभिधानाने पावन झाले. येथेच माऊलीने आपले पुढील संपूर्ण आयुष्य “संसार करून परमार्थ साधा” या आपल्या भक्तांसाठी बोधप्रद ठरलेल्या उक्तीनुसार व्यतीत केले व मानवी अवतार कार्याची अवधीतच संपन्नता केली.
मुळ आश्रम म्हणजेच माऊलींची घरकुल अर्थात संसार गृह स्थिती !
कोकणातील वालावल क्षेत्री, चौधरी कुटुंबातील गृह स्थितीत ह्या ॐ कारांच्या सव्विसाव्या अवतार कार्याचा प्रारंभ झाला. पुर्वाश्रमीचे हे वास्तव्य स्थान म्हणजे एक पर्ण कुटिका होती. पुढे पुढे त्यात बदल होत जावून, आताचे हे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. “वालावल” क्षेत्री जन्म म्हणून ते स्थान “जन्मस्थान”. ह्यालाच वालावल किंवा कोंकण आश्रम म्हणून ओळखतात.
“मालाड” हे संपूर्ण अवतार कार्यातील गृहस्थिती स्थान असल्याने, ते मुळ स्थान “मुळाश्रम” या नामाभिधानाने पावन झाले. येथेच माऊलींनी आपले पुढील संपूर्ण आयुष्य “संसार करून परमार्थ साधा” ह्या आपल्या भक्तांसाठी बोधप्रद ठरलेल्या, आपल्या उक्तीनुसार व्यतित केले व मानवी अवतार कार्याची समाप्ती केली.
ॐ कारांनी ह्या युगातील (सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आताचे हे शेवटचे कलीयुग) आपल्या मानव अवतार कार्याची स्थिती ही राजमहालात किंवा अती उच्च कुळात न करता, सर्वसामान्य जनते सारखी कोंकण परिसरातील एका क्षत्रिय कुळातील शेतकरी कुटुंबात केली आणि सामान्य जीवन जगून, असामान्य कर्तृत्व करून कलियुगाच्या नाशाचा पाया रचून, सत् युगाचा प्रारंभ केला.